Tuesday, September 26, 2023
Homeबातम्याशेतकरी लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा ह्रदयद्रावक मृत्यू; आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष...

शेतकरी लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा ह्रदयद्रावक मृत्यू; आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का?

मुंबई | शेतकरी लाँग मार्चच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्याना रूग्ण्लयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.

पुंडलिक जाधव या शेतकऱ्याला शुक्रवारी रात्री उलट्यांचा त्रास व अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना वासिंद येथे उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जाधव यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून अधिक तपास वासिंद पोलीस करीत आहेत. पुंडलिक जाधव नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मावडी येथे वास्तव्यास होते.

१२ मार्चपासून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील पाच ते सहा लोक रस्त्यात अस्वस्थ झाले आहेत. मोर्चातील एका महिलेला चालत असताना चक्कर आली त्यानंतर नाशिक जिल्ह्याची हद्द सोडल्यानंतर एका आंदोलकाचा अपघात झाला त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एक महिला पायी चालत असताना खड्ड्यात पडल्यामुळे ती जखमी झाली आहे त्यानंतर आता एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांनी घरूनच अन्नधान्य सुद्धा आणलेला आहे तर काही घरून आणलेल्या भाजी भाकरीवरच पोट भरत आहेत पायी चालत असताना त्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे घरून आणलेल्या अन्नावरच भागवले जात असल्याचं मोर्चेतील आंदोलक सांगत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular