Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # Kisanwani: आवाज.. शेती, माती & संस्कृतीचा! ## Sitemaps [XML Sitemap](https://kisanwani.com/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [Maharashtra Weather 2026 | महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; 7 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट, अनेक भागांत विजांसह पावसाची शक्यता](https://kisanwani.com/maharashtra-weather-2026/): महाराष्ट्रात परतीच्या पावसाच्या सरी काही भागांत हजेरी लावत(Maharashtra Weather 2026)असल्या तरी राज्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच हवामानशास्त्र विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, सातारा, सातारा घाटमाथा, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता असून काही भागांत हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. - [Oat Fodder Crop | रब्बी हंगामात ओट पौष्टिक चाऱ्याचा चांगला पर्याय; अडीच महिन्यांत पहिली कापणी, 600 क्विंटलपर्यंत हिरवा चारा](https://kisanwani.com/oat-fodder-crop/): किसानवाणी : रब्बी हंगामात जनावरांसाठी हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध(Oat Fodder Crop)करून देण्यासाठी ओट हे महत्त्वाचे चारा पीक मानले जाते. थंड हवामान ओट पिकाला चांगले मानवते. ओटचा पाला हिरवा आणि पौष्टिक असून त्याचे खोड मऊ आणि रसाळ असतात. त्यामुळे जनावरे हा चारा आवडीने खातात. ओटचा वापर हिरवा चारा, वाळलेला चारा, भुसा तसेच मुरघास तयार करण्यासाठी करता येतो. योग्य नियोजन केल्यास ओट पिकातून एक किंवा दोन कापण्या घेऊन मोठ्या प्रमाणात हिरवा चारा मिळवता येतो. दुबार कापणीच्या वाणांमध्ये पहिली कापणी साधारण अडीच महिन्यांच्या आत घेता येते. - [White Grub Control in Sugarcane | उसातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण; अळीमुळे मुळे कुरतडली जात असल्याने वेळीच उपाययोजना गरजेच्या](https://kisanwani.com/white-grub-control-in-sugarcane/): ऊस पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव(White Grub Control in Sugarcane)झाल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. हुमणीच्या अळ्या सुरुवातीच्या अवस्थेत जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर किंवा जिवंत मुळांवर उपजीविका करतात. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस तसेच इतर पिकांच्या मुळ्या कुरतडून खातात. मुळांचे नुकसान झाल्यामुळे पिकाची अन्नद्रव्ये आणि पाणी शोषून घेण्याची प्रक्रिया बाधित होते. परिणामी प्रादुर्भाव झालेला ऊस निस्तेज दिसू लागतो, पाने मरगळतात आणि हळूहळू पिवळी पडण्यास सुरुवात होते. प्रादुर्भाव तीव्र असल्यास साधारण 20 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण ऊस वाळून काठीसारखा दिसू शकतो. - [Tomato Disease Management | टोमॅटोवरील करपा आणि फळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढला; वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करा](https://kisanwani.com/tomato-disease-management/): खरीप हंगामात टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव(Tomato Disease Management)इतर हंगामांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो. सध्या टोमॅटो पिकामध्ये लवकर येणारा करपा म्हणजेच अर्ली ब्लाइट आणि फळसड या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रता यामुळे या रोगांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि त्यानुसार नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. - [Sugarcane Farming |उसामध्ये विषाणूजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव; यलो लीफ, गवताळ वाढ आणि मोझेक रोगावर वेळीच नियंत्रण गरजेचे](https://kisanwani.com/sugarcane-farming/): किसानवाणी : हवामानातील बदलांमुळे उसामध्ये विविध विषाणूजन्य(Sugarcane Farming)रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. या रोगांमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याबरोबरच ऊस आणि साखरेच्या उत्पादनातही घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेत नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. उसामध्ये यलो लीफ, गवताळ वाढ आणि मोझेक हे महत्त्वाचे रोग असून, त्यांचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बेणे आणि रसशोषक किडींद्वारे होतो. - [Livestock Management Animal Care | पावसाचा खंड, जनावरांवरही ताण; चारा, पाणी आणि लसीकरणाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला](https://kisanwani.com/livestock-management-animal-care/): किसानवाणी : पावसाचा मोठा खंड पडल्यास त्याचा परिणाम केवळ पिकांवरच होत नाही, तर(Livestock Management Animal Care) जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावरही होऊ शकतो. पावसाची उघडीप वाढल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होणे, उष्णतेचा ताण वाढणे तसेच गोचीड, गोमाशे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जनावरांच्या चारा, पाणी, निवारा, बाह्यपरजीवी नियंत्रण आणि लसीकरणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास पावसाच्या खंडाच्या काळात जनावरांवरील ताण कमी करून त्यांचे आरोग्य आणि उत्पादन टिकवण्यास मदत होऊ शकते. - [Weak Monsoon | महाराष्ट्रात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट](https://kisanwani.com/weak-monsoon/): किसानवाणी : महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची दडी(Weak Monsoon)कायम असल्याने अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान, आज 19 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या विस्कळीत झाला असून, कमी दाबाची प्रणाली निवळल्यानंतर उत्तर गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच उत्तर तमिळनाडू परिसरावर समुद्रसपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याचे हवामान विभागाच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. मराठवाड्यापासून कर्नाटकमार्गे आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. - [‘Reel for Soil & Water Conservation’ स्पर्धा; १५ ते ३० वयोगटातील युवकांना संधी](https://kisanwani.com/reel-for-soil-water-conservation/): मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘Reel for Soil & Water Conservation’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. रील अपलोड करण्याचा कालावधी १५ ते २१ ऑगस्ट आहे. - [Cotton Processing | कापूसटंचाईचा जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला मोठा फटका; खानदेशातील अनेक कारखाने महिनाभर आधीच बंद](https://kisanwani.com/cotton-processing/): किसानवाणी : खानदेशातील कापूस प्रक्रिया उद्योगाला यंदाच्या हंगामात मोठा(Cotton Processing)फटका बसला असून, कापसाची कमी आवक, बाजारातील अस्थिरता आणि विस्कळीत पुरवठा साखळी यामुळे कापूसगाठी तयार करणाऱ्या जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांची धडधड नेहमीपेक्षा तब्बल एक ते दीड महिना आधीच थांबली आहे. परिणामी, कापूस प्रक्रिया उद्योगासह कापूसगाठींच्या उत्पादनातही मोठी घट नोंदवली गेली आहे. दरवर्षी ऑक्टोबरपासून सुरू होणारा आणि सप्टेंबरपर्यंत चालणारा कापूस प्रक्रिया हंगाम यंदा जुलैमध्येच संपुष्टात आल्याचे उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे. - [ड्रॅगन फ्रूटची आवक तिपटीने वाढली; दोन दिवसांत बाजारभावात मोठी घसरण, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट | Dragon Fruit](https://kisanwani.com/dragon-fruit/): किसानवाणी : स्थानिक फळ व भाजीपाला बाजारात गेल्या पंधरवड्यापासून ड्रॅगन फ्रूटची(Dragon Fruit)आवक सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः बुधवारी (ता. २९) बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक तब्बल २१० क्विंटलवर पोहोचली. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत आवक तिपटीहून अधिक वाढल्याने बाजारातील मागणी-पुरवठ्याचे संतुलन बदलले असून त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. वाढलेल्या आवकेमुळे ड्रॅगन फ्रूटच्या बाजारभावावर दबाव निर्माण झाला असून सध्या या फळाला ४,००० ते ६,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे. - [महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, पुणे, सातारा रेड अलर्टवर, ‘या’ जिल्ह्यांतही जोरदार सरींचा अंदाज | Low Pressure Area](https://kisanwani.com/low-pressure-area/): किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर(Low Pressure Area)अद्याप कायम असून अनेक भागांत जोरदार ते मुसळधार सरी कोसळत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आजही राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. - [E-KYC पूर्णपणे मोफत; शुल्क आकारणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांवर कठोर कारवाई | Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC](https://kisanwani.com/maharashtra-farmer-loan-waiver-e-kyc/): किसानवाणी : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी (Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC) आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेसंदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण सूचना जारी करत स्पष्ट केले आहे की, आपले सरकार सेवा केंद्रांवर ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही लाभार्थी शेतकऱ्याकडून यासाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश सर्व सेवा केंद्रांना देण्यात आले आहेत. - [NPA पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीसाठी बँकांना पाळावे लागणार हे बंधनकारक सूत्र; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Maharashtra NPA Accounts](https://kisanwani.com/maharashtra-npa-accounts/): किसानवाणी : राज्यात सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुत्पादक (Maharashtra NPA Accounts) खात्यांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांवरच असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाने यासाठी निश्चित केलेल्या सवलत सूत्राची प्रत्येक बँकेने काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक असून, त्यामध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी किंवा अनावश्यक विलंब होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. - [साखरेच्या वाढत्या दरांवर सरकारचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून ४०० टनांची साठा मर्यादा लागू ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती| Sugar Stock Limit](https://kisanwani.com/sugar-stock-limit/): किसानवाणी : देशात गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या किरकोळ आणि घाऊक दरांमध्ये(Sugar Stock Limit)सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत केंद्र सरकारने साखर विक्रेत्यांवर साठा मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला असून, १ ऑगस्टपासून ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही विक्रेत्याला कमाल ४०० टन साखरेचाच साठा ठेवण्याची परवानगी असेल. या निर्णयामुळे साखरेची साठेबाजी रोखण्यास मदत होईल आणि ग्राहकांना वाढत्या दरांपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. - [द्राक्ष बागायतदारांसाठी मोठा इशारा! भुरी-केवडा रोखण्यासाठी हीच योग्य वेळ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती |Grape Vineyard](https://kisanwani.com/grape-vineyard/): किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध द्राक्ष उत्पादक(Grape Vineyard)पट्ट्यांमध्ये मागील आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली असून, बदलत्या हवामानामुळे आता द्राक्ष बागांमध्ये भुरी (Powdery Mildew) आणि केवडा (Downy Mildew) या रोगांच्या नियंत्रणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः नाशिक, जुन्नर आणि नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वातावरणात आर्द्रता वाढली असून काही भागांमध्ये केवडा रोगाची सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. - [सोयाबीनची पाने पिवळी पडतायत? कारण ओळखा, मगच करा उपाय; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Soybean Yellow Leaves](https://kisanwani.com/soybean-yellow-leaves/): किसानवाणी : राज्यात यंदा वेळेत पेरणी झालेल्या बहुतांश भागांमध्ये सोयाबीन पीक(Soybean Yellow Leaves)सध्या २० ते ३० दिवसांच्या वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकामध्ये पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे, झाडांचा जोम कमी होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अनेक शेतकरी या समस्येमुळे चिंतेत असून, तातडीने औषधांची फवारणी किंवा खतांचा वापर करण्याचा विचार करत आहेत. परंतु तज्ज्ञांच्या मते, कोणताही उपाय करण्यापूर्वी पिवळेपणामागील नेमके कारण ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. - [देशी की विदेशी वृक्ष? शास्त्र काय सांगते, जाणून घ्या संपूर्ण सत्य | Tree Plantation](https://kisanwani.com/tree-plantation/): किसानवाणी : देशात पावसाळा सुरू झाला की वृक्षलागवडीबाबत सोशल मीडियावर (Tree Plantation)अनेक प्रकारचे संदेश व्हायरल होताना दिसतात. विशेषतः निलगिरी, सुबाभूळ, ग्लिरिसिडिया यांसारख्या विदेशी वृक्षप्रजातींना पर्यावरणाचे शत्रू ठरवले जाते, तर दुसरीकडे फक्त देशी वृक्षांची लागवड करण्याचा आग्रह धरला जातो. मात्र या विषयाकडे भावनिक दृष्टिकोनातून नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आधुनिक वनीकरण, परिसंस्था व्यवस्थापन आणि कृषिवनशेतीचा मूलभूत सिद्धांत स्पष्ट सांगतो की, "योग्य ठिकाणी, योग्य उद्देशासाठी योग्य वृक्ष" हीच शाश्वत वृक्षलागवडीची गुरुकिल्ली आहे. - [Maharashtra Weather Update Heavy Rainfall | राज्यात पुन्हा पावसाचा जोर; ‘या’ 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील 5 दिवस IMD चा इशारा](https://kisanwani.com/maharashtra-weather-update-heavy-rainfall/): किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र (Maharashtra Weather Update Heavy Rainfall) आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव तसेच अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट तर काही भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. - [मूग-उडीद उत्पादकांसाठी मोठी बातमी! पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्याचे फक्त ३ दिवस शिल्लक | Kharif Crop Competition](https://kisanwani.com/kharif-crop-competition/): किसानवाणी : राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी(Kharif Crop Competition)आणि अधिक उत्पादन देणाऱ्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. खरीप हंगाम २०२६-२७ साठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, त्याअंतर्गत मूग आणि उडीद पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे अर्ज करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. - [Farm Loan Waiver | 1.05 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; ई-केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही](https://kisanwani.com/farm-loan-waiver/): किसानवाणी : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ (Farm Loan Waiver) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील 1,276 गावांमधील एकूण 1 लाख 5 हजार 128 शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 769 शेतकऱ्यांनी ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) प्रक्रिया पूर्ण केली असून उर्वरित 90 हजार 359 शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. - [EL Niño 2026 | एल निनो आणखी तीव्र होणार; १९५० नंतरचा सर्वात शक्तिशाली ठरण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियाचा इशारा](https://kisanwani.com/el-nino-2026/): किसानवाणी : ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने (EL Niño 2026) प्रसिद्ध केलेल्या दक्षिण गोलार्धाच्या ताज्या हवामान अहवालात एल निनोच्या स्थितीबाबत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. जूनच्या मध्यापासून सक्रिय असलेला एल निनो आता अधिक तीव्र होत असून, येत्या काही महिन्यांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंद महासागर द्विध्रुवीयता (Indian Ocean Dipole - IOD) देखील सकारात्मक टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले असून, त्यामुळे जागतिक हवामानातील बदल अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. - [कर्जमाफीच्या १७ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? जिल्हानिहाय यादी पाहा | Farm Loan Waiver List](https://kisanwani.com/farm-loan-waiver-list/): किसानवाणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Farm Loan Waiver List) राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे १७ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू नये यासाठी केंद्रीय प्राप्तिकर विभागामार्फत पडताळणी करण्यात आल्यानंतरच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. - [हळदीत होणार मोठी क्रांती! गॅमा किरणांच्या साहाय्याने तयार होणार उच्च उत्पादनक्षम नवीन वाण | Turmeric Research Mutation Breeding](https://kisanwani.com/turmeric-research-mutation-breeding/): किसानवाणी : हळद हे भारतातील महत्त्वाचे मसाला पीक असून औषधी, पोषणमूल्य आणि निर्यातक्षमतेच्या दृष्टीने (Turmeric Research Mutation Breeding) त्याला विशेष महत्त्व आहे. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादन देणारे, उच्च दर्जाचे आणि रोगांना प्रतिकार करणारे हळदीचे नवीन वाण विकसित करण्यासाठी संशोधनाला वेग आला आहे. या दिशेने वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रात गॅमा किरणांच्या साहाय्याने उत्परिवर्तन पैदास संशोधनाची सुरुवात करण्यात आली आहे. - [Maharashtra Loan Waiver News 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या यादीत नाव नसले तरी मिळणार लाभ – कृषिमंत्र्यांची ग्वाही](https://kisanwani.com/maharashtra-loan-waiver-news-2026/): किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक माहिती समोर (Maharashtra Loan Waiver News 2026) आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या कर्जमाफीच्या यादीत नसले तरी त्यांनी कोणतीही घाई किंवा चिंता करू नये, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देताना, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत जाईल तशा टप्प्याटप्प्याने नवीन याद्या प्रसिद्ध करण्यात येतील आणि पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश केला जाईल, असे सांगितले. - [Fish Feed Guide | योग्य मत्स्य खाद्य निवडण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून ‘घ्या’](https://kisanwani.com/fish-feed-guide/): किसानवाणी : आधुनिक मत्स्यपालनामध्ये अधिक उत्पादन, कमी उत्पादन खर्च (Fish Feed Guide) आणि जास्त आर्थिक नफा मिळविण्यासाठी दर्जेदार, संतुलित आणि वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या मत्स्य खाद्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मत्स्यपालनातील एकूण खर्चापैकी सुमारे ५० ते ७० टक्के खर्च हा केवळ खाद्यावर होत असल्यामुळे योग्य खाद्याची निवड आणि त्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हे यशस्वी मत्स्यपालनाचे प्रमुख आधारस्तंभ ठरतात. माशांच्या वाढीचा वेग, खाद्य रूपांतरण गुणोत्तर (FCR), रोगप्रतिकारक क्षमता, जगण्याचे प्रमाण तसेच अंतिम उत्पादनाची गुणवत्ता या सर्व बाबी थेट खाद्याच्या गुणवत्तेशी संबंधित असतात. त्यामुळे माशांच्या वय, वजन आणि वाढीच्या टप्प्यानुसार संतुलित पोषणमूल्य असलेले खाद्य योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे. - [रानभाज्यांतील जैवसक्रिय घटकांचा खजिना; पोषणसुरक्षा, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी आरोग्यासाठी ठरतात वरदान | Wild Vegetables Bioactive Compounds](https://kisanwani.com/wild-vegetables-bioactive-compounds/): किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि समृद्ध (Wild Vegetables Bioactive Compounds) जैवविविधतेमुळे अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात या भाज्या सहज मिळत असल्याने त्या कमी खर्चात उपलब्ध होणारा पौष्टिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक अन्नस्रोत म्हणून ओळखल्या जातात. पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या रानभाज्यांकडे आता आधुनिक वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वाने पाहिले जात आहे. विविध संशोधनांमधून रानभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजद्रव्ये, प्रथिने, आहारातील तंतू तसेच अनेक जैवरासायनिक सक्रिय संयुगे मुबलक प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोषणसुरक्षा वाढविणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आणि शाश्वत आहार प्रणाली विकसित करण्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. - [आजचे बाजारभाव: सोयाबीन दरात घसरण; हरभरा चढ-उतारात, पालक-फ्लॉवर स्थिर तर पपईच्या आवकेत घट | Soybean Market Bulletin](https://kisanwani.com/soybean-market-bulletin/): किसानवाणी : सोयाबीन बाजारात आज घसरणीचा कल कायम असल्याचे राज्यातील प्रमुख बाजार (Soybean Market Bulletin) समित्यांमधील व्यवहारावरून स्पष्ट झाले. काही बाजारांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असली तरी दरात मात्र घसरण झाली. विशेषतः अकोला, औसा आणि मुरुम या बाजार समित्यांमध्ये सरासरी दरात लक्षणीय घट नोंदविण्यात आली. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा दिवस निराशाजनक ठरला. - [आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट | Maharashtra Rain Update IMD Forecast](https://kisanwani.com/maharashtra-rain-update-imd-forecast/): किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला (Maharashtra Rain Update IMD Forecast) असला तरी अनेक भागांमध्ये ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने आज (ता. २८) कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. - [महिला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन | Maharashtra Women Farmers](https://kisanwani.com/maharashtra-women-farmers/): किसानवाणी : राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, अनुदान, अर्थसाह्य, विविध हक्क(Maharashtra Women Farmers) आणि कृषी क्षेत्रातील सेवासुविधांचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा-२०२६' अंतर्गत राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन करण्यात आली असून, महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया स्पष्ट करणारे राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेती आणि संलग्न व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या लाखो महिलांना अधिकृत ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - [वन्य प्राण्यांमुळे 10 हजार ते 40 हजार कोटींचे पीक नुकसान; भरपाई मात्र फक्त 50 कोटींच्या आसपास | Maharashtra Wildlife](https://kisanwani.com/maharashtra-wildlife/): किसानवाणी : महाराष्ट्रात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हा दिवसेंदिवस गंभीर (Maharashtra Wildlife) होत चाललेला प्रश्न असून, वर्षानुवर्षे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये केवळ नुकसानभरपाई नव्हे तर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. सध्या वनविभागामार्फत पीक नुकसानीसाठी स्वतंत्र नुकसानभरपाईची व्यवस्था असली तरी ती शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी नसल्याचे विविध अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. - [हळदीचे 10 सर्वोत्तम वाण; कोणता देईल सर्वाधिक उत्पादन आणि जास्त कुरकुमीन? | Turmeric Varieties](https://kisanwani.com/turmeric-varieties/): किसानवाणी : महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये हळद (Turmeric Varieties) हे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून घेतले जाते. बाजारपेठेतील मागणी, कुरकुमीनचे प्रमाण, वाळलेल्या हळदीचा उतारा, उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारक गुणधर्म या बाबी लक्षात घेऊन शेतकरी योग्य वाणाची निवड करतात. महाराष्ट्रात पारंपरिक वाणांबरोबरच कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले अनेक सुधारित वाणही उपलब्ध आहेत. प्रत्येक वाणाची उत्पादन क्षमता, पक्व होण्याचा कालावधी, हळकुंडांचा आकार, रंग आणि रोग सहनशीलता वेगवेगळी असल्याने लागवडीपूर्वी वाणांची वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक ठरते. - [रानभाज्या ठरतात पोषणाचा खजिना; अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि औषधी गुणधर्मांचा समृद्ध स्रोत | Wild Vegetables](https://kisanwani.com/wild-vegetables/): किसानवाणी : ग्रामीण भागातील पारंपरिक आहारसंस्कृतीमध्ये रानभाज्यांना (Wild Vegetables) अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या हंगामात शेतीच्या बांधावर, माळरानावर तसेच जंगल परिसरात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अनेक वनस्पतींची पाने, कोवळे खोड आणि इतर भाग भाजी म्हणून वापरले जातात. महाराष्ट्रात तांदुळजा, अंबाडी, टाकळा, कोळभाजी, चवळीची पाने, शेपू यांसारख्या रानभाज्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहाराचा भाग आहेत. या भाज्या सहज उपलब्ध असल्यामुळे त्या स्वस्त, पौष्टिक आणि पर्यावरणपूरक अन्नस्रोत म्हणून ओळखल्या जातात. - [Beekeeping Schemes | मधुमक्षिकापालनासाठी 50% अनुदान, मोफत प्रशिक्षण; पात्रांकडून अर्ज मागविले](https://kisanwani.com/beekeeping-schemes/): किसानवाणी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यात मधकेंद्र योजना (Beekeeping Schemes) प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती तसेच संस्थांकडून लाभासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, शेतकरी तसेच इच्छुक संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. जौंजाळ यांनी केले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच मध उत्पादनाला चालना देणे, मधमाशी संवर्धन वाढविणे आणि शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. - [मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल आणि एल निनोमुळे भाव तेजीत जाण्याची शक्यता | India Maize Market](https://kisanwani.com/india-maize-market/): किसानवाणी : भारतातील मका बाजार गेल्या वर्षभरापासून दबावाखाली होता. वाढलेले उत्पादन, इथेनॉल (India Maize Market) निर्मितीसाठी सरकारकडून स्वस्त तांदळाचा पुरवठा आणि उसाचे चांगले उत्पादन यामुळे मक्याच्या मागणीत घट झाली होती. परिणामी अनेक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दराने मका विकावा लागला. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत असून, इथेनॉल उद्योगाची वाढती गरज, एल निनोचा संभाव्य परिणाम, कमी पावसामुळे घटणारे उत्पादन आणि निर्यातीत झालेली वाढ या कारणांमुळे आगामी काळात मक्याच्या भावाला पुन्हा आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - [महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट, जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज | Maharashtra Monsoon Weather News](https://kisanwani.com/maharashtra-monsoon-weather-news/): किसानवाणी : हवामानशास्त्र विभागाने (Maharashtra Monsoon Weather News ) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव कायम असून येत्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत हलक्या ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - [शिराळ्यात गवा-रानडुकरांचा वाढता उपद्रव; भातपिकांचे मोठे नुकसान, पंचनामा न झाल्यास उपोषणाचा इशारा | Shirala Wild Animal Attack](https://kisanwani.com/shirala-wild-animal-attack/): किसानवाणी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा परिसरात गवा, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांच्या वाढत्या (Shirala Wild Animal Attack) उपद्रवामुळे शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. वन्यप्राण्यांकडून भातपिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी केलेल्या मागण्यांकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. - [राज्यातील 3 लाख शेतकरी ‘फार्मर आयडी’पासून वंचित; कर्जमाफी, पीकविमा योजनांवर परिणाम | Farmer ID Maharashtra Farmers](https://kisanwani.com/farmer-id-maharashtra-farmers/): किसानवाणी : राज्यातील भोगवटादार वर्ग दोन, महार वतन, देवस्थान (Farmer ID Maharashtra Farmers) तसेच इतर विशेष भूधारणा प्रकारातील अंदाजे तीन लाख शेतकरी तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात ‘फार्मर आयडी’ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना पीकविमा, विविध शासकीय कृषी योजना तसेच आगामी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - [पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! १३ ऑगस्टपासून राज्यभर लाळ्या खुरकूत लसीकरण मोहीम | Foot and Mouth Disease](https://kisanwani.com/foot-and-mouth-disease/): किसानवाणी : राज्यातील पशुधनाला लाळ्या खुरकूत (Foot and Mouth Disease) या अत्यंत संसर्गजन्य आणि घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण मिळावे, यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची नववी फेरी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. - [कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! पुण्यातील 61,900 शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ | Farm Loan Waiver Pune](https://kisanwani.com/farm-loan-waiver-pune/): किसानवाणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे (Farm Loan Waiver Pune) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या पडताळणीनंतर जाहीर होणार. - [फळबाग लागवडीत क्रांती! सीआरए तंत्रज्ञानामुळे ६०% पर्यंत पाण्याची बचत | CRA Technology](https://kisanwani.com/cra-technology/): किसानवाणी : हवामान बदल, अनियमित पाऊस आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर फळबाग लागवड अधिक शाश्वत करण्यासाठी सीआरए (CRA Technology) तंत्रज्ञान प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. हे तंत्रज्ञान विशेषतः कमी पर्जन्यमान असलेल्या भागांतील फळबागांसाठी उपयुक्त मानले जाते. या पद्धतीमध्ये पाणी आणि अन्नद्रव्ये थेट झाडांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात पोहोचविली जात असल्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो, मुळांची वाढ खोलवर होते आणि दुष्काळी परिस्थितीतही झाडांची वाढ व उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत मिळते. - [Soybean Yellow Mosaic Virus | सोयाबीन पीक पिवळं पडतंय? आधी कारण ओळखा, मगच करा उपाय](https://kisanwani.com/soybean-yellow-mosaic-virus/): किसानवाणी : सोयाबीन पिकात पिवळेपणा (Soybean Yellow Mosaic Virus) दिसू लागला की अनेक शेतकरी तातडीने खतांची किंवा औषधांची फवारणी करण्याचा निर्णय घेतात. मात्र, पिके पिवळी पडण्यामागे नेहमीच एकच कारण असते असे नाही. अन्नद्रव्यांची कमतरता, सततचा पाऊस, विषाणूजन्य रोग, रसशोषक किडी किंवा तणनाशकांचा चुकीचा वापर अशा अनेक कारणांमुळे सोयाबीनमध्ये पिवळेपणा दिसू शकतो. त्यामुळे कोणतेही औषध किंवा खत वापरण्यापूर्वी पिवळेपणाचे नेमके कारण ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य निदान करून उपाययोजना केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो आणि उत्पादनातील संभाव्य नुकसानही कमी करता येते, असा सल्ला प्रादेशिक संशोधन केंद्राच्या अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन प्रकल्पातील तज्ज्ञ प्रा. राजीव घावडे, प्रा. मंगेश दांडगे आणि डॉ. प्रवीण पाटील यांनी दिला आहे. - [आजचा हवामान इशारा: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता | Heavy Rainfall Continues Across Konkan](https://kisanwani.com/heavy-rainfall-continues-across-konkan/): किसानवाणी : राज्यात मॉन्सूनने पुन्हा जोर धरला असून कोकण, घाटमाथा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने आज (Heavy Rainfall Continues Across Konkan) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट कायम ठेवला असून, कोकण आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. - [पीकविमा भरूनही भरपाई नाही! त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा योजनेकडे फिरवली पाठ | PMFBY Crop Insurance Kharif 2026](https://kisanwani.com/pmfby-crop-insurance-kharif-2026/): किसानवाणी : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेला (पीकविमा भरूनही भरपाई नाही! त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा योजनेकडे फिरवली पाठ | PMFBY Crop Insurance Kharif 2026) यंदाच्या खरीप हंगामात खानदेशातील शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मागील हंगामात नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळाली नसल्याने तसेच विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. - [शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ५५३ शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ | Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme](https://kisanwani.com/maharashtra-farm-loan-waiver-punyashlok-ahilyadevi-holkar-scheme/): किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची (Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme) प्रत्यक्ष अंमलबजावणी मंगळवार (२२ जुलै) पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील ५५३ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे कामही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. - [महाडीबीटीवर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान, जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया | Cotton Shredder](https://kisanwani.com/cotton-shredder/): किसानवाणी : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून, केंद्र सरकार पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) २०२६-२७’ अंतर्गत कॉटन श्रेडर (Cotton Shredder) उपलब्ध करून देण्यासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कापूस शेतीत आधुनिक यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या योजनेत प्रथमच कॉटन श्रेडर या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार असून कापूस उत्पादन वाढीसाठीही या योजनेचा फायदा होणार आहे. - [ई-ठिबक पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; ठिबक वितरकांचे प्रस्ताव रद्द करू नका, कृषी विभागाच्या सूचना | Maharashtra E-Drip Portal](https://kisanwani.com/maharashtra-e-drip-portal/): किसानवाणी : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागाच्या ई-ठिबक (Maharashtra E-Drip Portal) पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ठिबक सिंचन अनुदानाशी संबंधित विविध प्रक्रिया रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फलोत्पादन संचालनालयाने राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) महत्त्वाच्या सूचना दिल्या असून, ई-ठिबक पोर्टलवरील तांत्रिक दोष दूर होईपर्यंत ठिबक वितरकांचे नोंदणी प्रस्ताव किंवा नूतनीकरणाचे प्रस्ताव रद्द करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. - [द्राक्ष बागायतदार सावधान! केवडा रोग कार्यरत होण्याची शक्यता; जैविक नियंत्रणावर तज्ज्ञांचा भर | Grape Farming Downy Mildew Biological Disease Control](https://kisanwani.com/grape-farming-downy-mildew-biological-disease-control/): किसानवाणी : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांसाठी सध्याचे हवामान अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आले असून, सलग पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील घट यामुळे द्राक्षांवरील केवडा (Grape Farming Downy Mildew Biological Disease Control ) रोग कार्यरत होण्यास पोषक वातावरण तयार होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध द्राक्ष पट्ट्यांमध्ये पावसाची स्थिती बदलत असून, पुढील काही दिवस केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरणार आहे. - [वृक्ष लागवड करताय? मग कोणता वृक्ष कुठे लावायचा हे आधी जाणून ‘घ्या’ | Choose Right Tree Plantation](https://kisanwani.com/choose-right-tree-plantation/): किसानवाणी : राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिमा राबविल्या (Choose Right Tree Plantation) जात असताना, केवळ उपलब्ध रोपे किंवा एखादी वृक्षप्रजाती लोकप्रिय आहे म्हणून तिची सर्वत्र लागवड करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक वृक्षप्रजातीची स्वतःची पर्यावरणीय गरज असते. त्यामुळे "एकच वृक्ष संपूर्ण महाराष्ट्रासाठी" हा दृष्टिकोन चुकीचा असून, योग्य ठिकाणासाठी योग्य वृक्षाची निवड हाच यशस्वी आणि शाश्वत वृक्ष लागवडीचा मूलमंत्र असल्याचे सांगितले जात आहे. - [महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट | Maharashtra Monsoon Red Orange Alert](https://kisanwani.com/maharashtra-monsoon-red-orange-alert/): किसानवाणी : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. राज्यात सध्या ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू असून पुढील तीन ते चार दिवसांत हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Monsoon Red Orange Alert ) व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. - [सोयाबीन उगवण न होण्यामागे बियाणे की पाऊस? तज्ज्ञांनी सांगितले खरं कारण | Soybean Germination SIAM](https://kisanwani.com/soybean-germination-siam/): किसानवाणी : महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात अनेक भागांत सोयाबीन (Soybean Germination) बियाण्यांची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून खासगी बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, राज्य शासनानेही काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ बियाण्यांचा दोष म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, असे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सीड इंडस्ट्री असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (SIAM) यांनी व्यक्त केले आहे. - [एल निनोचा प्रभाव वाढणार! मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७% शक्यता; NOAA चा ताजा अंदाज | El Nino NOAA](https://kisanwani.com/el-nino-noaa/): किसानवाणी : अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (El Nino NOAA) अंतर्गत कार्यरत असलेल्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (CPC) ने एल निनोच्या स्थितीबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. 'ENSO: Recent Evolution, Current Status and Forecast' या ताज्या अहवालानुसार, सध्या विकसित झालेली एल निनोची परिस्थिती येत्या काही महिन्यांत आणखी बळकट होण्याची शक्यता असून ती मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची तब्बल ९७ टक्के शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे जगातील अनेक भागांबरोबरच भारतातील मान्सून, तापमान आणि कृषी क्षेत्रावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. - [पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा वाढतो धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित करा लसीकरण | Goat Farming Enterotoxemia](https://kisanwani.com/goat-farming-enterotoxemia/): किसानवाणी : पावसाळ्याच्या सुरुवातीला रानात उगवणारे कोवळे हिरवे गवत हे शेळ्या आणि मेंढ्यांसाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. मात्र, याच काळात पशुपालकांसमोर एक गंभीर समस्या निर्माण होते. ती म्हणजे आंत्रविषार (पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा वाढतो धोका; 'ही' लक्षणे दिसताच त्वरित करा लसीकरण (Goat Farming Enterotoxemia) हा जीवघेणा आजार. हा आजार Clostridium perfringens या जिवाणूमुळे होतो. विशेष बाब म्हणजे, अनेक वेळा या आजाराची स्पष्ट लक्षणे दिसण्यापूर्वीच जनावराचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या आजारामध्ये उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर लसीकरणाला अधिक महत्त्व असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. - [देशातील पहिले ‘गो-पर्यटन केंद्र’ होणार विकसित; देशी गोवंश संवर्धनाला मिळणार नवी दिशा | Indigenous Cattle](https://kisanwani.com/indigenous-cattle/): किसानवाणी : उष्ण हवामानाशी सहज जुळवून घेण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती,(Indigenous Cattle) कमी खर्चात पालन, नैसर्गिक प्रजनन क्षमता तसेच शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला मिळणारे महत्त्वपूर्ण योगदान यामुळे देशी गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार मानला जातो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, मृदासंवर्धनाला चालना देणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे या दृष्टीनेही देशी गोवंशाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. - [हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव; युरोपात मानवी आरोग्य आणि जंगलांसमोर नवे संकट | Climate Change Oak Processionary Caterpillar](https://kisanwani.com/climate-change-oak-processionary-caterpillar/): किसानवाणी : हवामान बदलाचे परिणाम दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, त्याचे विविध स्वरूपात दुष्परिणाम जगभरात दिसून येत आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ, कमी कालावधीत होणारा अतिवृष्टीचा पाऊस, वाढते तापमान आणि बदलते ऋतुचक्र यामुळे शेतीसह पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. याच बदलांचा परिणाम आता कीड-रोगांच्या प्रादुर्भावावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये यावर्षी विषारी केसाळ सुरवंट, म्हणजेच ओक प्रोसेशनरी कॅटरपिलर (Climate Change Oak Processionary Caterpillar) यांच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली असून, हवामान बदल हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. - [महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, कोकणासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा | Maharashtra Rain Update Konkan Rain](https://kisanwani.com/maharashtra-rain-update-konkan-rain/): किसानवाणी : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला (Maharashtra Rain Update Konkan Rain) असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन विविध स्तरांचे अलर्ट जारी केले आहेत. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - [शेतकरी कर्जमाफीची प्राथमिक यादी उद्या जाहीर; ३० जुलैपूर्वी खात्यात जमा होणार रक्कम | Maharashtra Farmer Loan Waiver List](https://kisanwani.com/maharashtra-farmer-loan-waiver-list/): किसानवाणी : राज्यातील लाखो शेतकरी ज्या कर्जमाफीच्या यादीची आतुरतेने (Maharashtra Farmer Loan Waiver List) वाट पाहत आहेत, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक लाभार्थी यादी उद्याच जाहीर केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (२१ जुलै) दिली आहे. यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आला असून, ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. - [आंतरपिकांमध्ये कोणते तणनाशक फवारावे? जाणून ‘घ्या’ योग्य डोस आणि वेळ | Intercropping Herbicide](https://kisanwani.com/intercropping-herbicide/): किसानवाणी : राज्यात यंदा अनेक भागांमध्ये खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर तण (Intercropping Herbicide) नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे अनेक शेतकऱ्यांनी एकाच शेतात आंतरपिकांची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र, आंतरपिकांमध्ये कोणते तणनाशक वापरावे, कोणत्या प्रमाणात वापरावे आणि फवारणीची योग्य वेळ कोणती, याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. योग्य शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर केल्यास तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते आणि पिकांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. - [दुग्ध तंत्रज्ञानात करिअरची सुवर्णसंधी; नोकरीसोबत स्वतःचा उद्योगही उभारता येणार | Dairy Career](https://kisanwani.com/dairy-career/): किसानवाणी : भारतातील दुग्ध व्यवसाय गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. पूर्वी गावागावांतील दूध संकलन (Dairy Career) केंद्रांपुरता मर्यादित असलेला हा उद्योग आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक डेअरी प्लांट्सपर्यंत पोहोचला आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे दुग्ध उद्योगाचे स्वरूप अधिक आधुनिक झाले असून, या क्षेत्रात प्रशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यावसायिकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. - [एल निनोचा इशारा! महाराष्ट्रातील खरीप शेतीसमोर कोणती मोठी आव्हाने? | El Nino Maharashtra Monsoon](https://kisanwani.com/el-nino-maharashtra-monsoon/): किसानवाणी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने ( El Nino Maharashtra Monsoon ) यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा सुमारे १२ टक्के पावसाची तूट राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामागे ‘एल निनो’ची स्थिती हे प्रमुख कारण मानले जात आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, राज्यातील बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रातील सुमारे ७५ टक्के शेती ही पावसावर अवलंबून असून, निम्म्याहून अधिक लोकसंख्येची उपजीविका शेतीवर आधारित आहे. त्यामुळे एल निनोचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - [सोयाबीनची उगवण कमी का होते? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे आणि प्रभावी उपाय | Soybean Germination](https://kisanwani.com/soybean-germination/): किसानवाणी : सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून चांगल्या (Soybean Germination) उत्पादनासाठी पेरणीनंतर बियाण्याची योग्य उगवण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक वेळा शेतकरी दर्जेदार बियाणे वापरूनही अपेक्षित उगवण होत नसल्याची तक्रार करतात. उगवण कमी होण्यामागे केवळ बियाण्याचा दर्जा कारणीभूत नसतो, तर त्यामागे जैविक, भौतिक, रासायनिक तसेच व्यवस्थापनाशी संबंधित अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे या कारणांची वैज्ञानिक माहिती असणे आणि योग्य उपाययोजना करणे आवश्यक ठरते. - [एल निनोचा परिणाम! दूध, अंडी, चिकन महागले; आता डाळींचे दरही वाढणार? | Protein Food Inflation](https://kisanwani.com/protein-food-inflation/): किसानवाणी : देशातील प्रथिनयुक्त अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ (Protein Food Inflation) होत असून, यामागे एल निनोचा प्रभाव, वाढत्या उष्णतेच्या लाटा, पशुखाद्याचे वाढलेले दर आणि पश्चिम आशियातील युद्ध यांसारखी अनेक कारणे जबाबदार असल्याचे अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीमुळे दूध, अंडी, चिकन, मासे आणि मटणाच्या किमतींमध्ये वाढ झाली असून, आगामी काही महिन्यांत तूर, मूग, उडीद आणि हरभरा यांसारख्या कडधान्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. - [केळी उत्पादकांची लूट? जाहीर दरांपेक्षा ६०० रुपये कमी भावाने खरेदीचा आरोप | Banana Farmers Market](https://kisanwani.com/banana-farmers-market/): किसानवाणी : खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या तीव्र नाराजीचे वातावरण आहे. परिसरात केळीचा (Banana Farmers Market) पुरवठा तुलनेने कमी असतानाही उत्पादकांना समाधानकारक दर मिळत नसल्याची तक्रार पुढे आली आहे. जळगाव जिल्हा केळी दर समितीकडून दररोज केळीचे अधिकृत दर जाहीर केले जात असले, तरी प्रत्यक्ष व्यवहार त्या दरांनुसार होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कारणे पुढे करून व्यापारी चार ते पाच वेगवेगळ्या दरांनी केळीची खरेदी करत असल्याने उत्पादकांची आर्थिक पातळीवर लूट होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. - [इथेनॉल उत्पादनासाठी एफसीआयकडील ७२ लाख टन तांदूळ राखीव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय | Ethanol Production](https://kisanwani.com/ethanol-production/): किसानवाणी : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०२६-२७ या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी (नोव्हेंबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७) भारतीय अन्न महामंडळाच्या (Ethanol Production) साठ्यातील तब्बल ७२ लाख टन तांदूळ इथेनॉल उत्पादनासाठी राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षी हे प्रमाण ५२ लाख टन इतके होते. याशिवाय, इथेनॉल उद्योगाला अतिरिक्त कच्चा माल उपलब्ध करून देण्यासाठी ५५ लाख टन ‘ब्रोकन राईस’ ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. - [कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट | Maharashtra Weather Heavy Rain Alert](https://kisanwani.com/maharashtra-weather-heavy-rain-alert/): किसानवाणी : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Maharashtra Weather Heavy Rain Alert) असून, भारतीय हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथा परिसरासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी सुरू असून, आज (ता. २१) विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. - [Ready To Cook भाज्यांची वाढती मागणी; शेतकरी, FPO आणि बचत गटांसाठी सुवर्णसंधी | Fresh Cut Vegetables](https://kisanwani.com/fresh-cut-vegetables/): किसानवाणी : बदलती जीवनशैली, वाढती शहरीकरणाची प्रक्रिया आणि वेळेची कमतरता (Fresh Cut Vegetables) यामुळे भारतात ताज्या, स्वच्छ धुतलेल्या आणि कापलेल्या भाज्यांची, म्हणजेच 'फ्रेश कट' किंवा 'रेडी-टू-कूक' उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा व्यवसाय प्रामुख्याने परदेशात लोकप्रिय होता. मात्र आता भारतीय ग्राहकांच्याही सवयी बदलत असून, स्वयंपाकासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी करणाऱ्या उत्पादनांना अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), महिला बचत गट आणि कृषी उद्योजकांसाठी मोठी आर्थिक संधी ठरू शकतो. - [कापसाच्या दरात तेजीची चिन्हे; कमी लागवड आणि जागतिक दरवाढीचा परिणाम.. | Cotton Price](https://kisanwani.com/cotton-price/): किसानवाणी : देशातील कापूस बाजाराला सध्या सकारात्मक वातावरण मिळत असून, यंदा कापसाखालील (Cotton Price) लागवड क्षेत्रात झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या दरातील वाढ यामुळे देशांतर्गत कापसाच्या किमतींना चांगला आधार मिळत आहे. भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांनी सलग दोन दिवसांत कापसाच्या विक्री दरात प्रति कँडी (३५६ किलो) तब्बल ८०० रुपयांची वाढ केल्याने बाजारात तेजीचे संकेत अधिक स्पष्ट झाले आहेत. - [पीकविमा भरण्याची शेवटची संधी! ३१ जुलैपूर्वी करा अर्ज; अॅग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक | PM Crop Insurance Scheme PMFBY](https://kisanwani.com/pm-crop-insurance-scheme-pmfby/): किसानवाणी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे या उद्देशाने राज्यात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना ( PM Crop Insurance Scheme PMFBY) राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे. - [शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन बियाणे धोरण; बनावट बियाण्यांवर बसणार कडक लगाम | Maharashtra Seed Policy Quality](https://kisanwani.com/maharashtra-seed-policy-quality/): किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि प्रमाणित बियाणे (Maharashtra Seed Policy Quality) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करणार आहे. निकृष्ट आणि बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखणे, बियाणे व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करणे आणि गुणवत्ता नियंत्रण अधिक सक्षम करणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. - [ग्रामपंचायतींसाठी मोठी खुशखबर! १६ व्या वित्त आयोगातून महाराष्ट्राला ₹32,829 कोटींचा निधी | Maharashtra Rural Development](https://kisanwani.com/maharashtra-rural-development/): किसानवाणी : २०२६ ते २०३१ हा कालावधी भारताच्या ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण देशाने २०३० पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्टे (Maharashtra Rural Development) पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तसेच ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रस्थानी असणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार महाराष्ट्र शासनाने १५ जून २०२६ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय केवळ निधी वितरणापुरता मर्यादित नसून ग्रामपंचायतींची आर्थिक शिस्त, उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि परिणामाधिष्ठित विकास यावर भर देणारा मार्गदर्शक दस्तऐवज मानला जात आहे. - [शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! १८ जुलैला पंढरपुरात निघणार ‘सद्बुद्धी दिंडी’ | Shaktipeeth Highway Farmers Protest](https://kisanwani.com/shaktipeeth-highway-farmers-protest/): किसानवाणी : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचे (Shaktipeeth Highway Farmers Protest) आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, हा महामार्ग प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आता आंदोलनाला धार्मिक आणि लोकशाही मार्गाची जोड देण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ जिल्ह्यांतील महामार्गबाधित शेतकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी न्याय मागण्यासाठी एकत्र येणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी, १८ जुलै रोजी पंढरपूर येथे 'सद्बुद्धी दिंडी यात्रा' काढण्यात येणार असून, या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. - [शेतमाल गोदामांवर WDRA ची कडक नजर! नियमित तपासणी का आहे इतकी महत्त्वाची? | WDRA Warehouse Inspection Agricultural Storage](https://kisanwani.com/wdra-warehouse-inspection-agricultural-storage/): किसानवाणी : देशात कृषी उत्पादनांच्या वैज्ञानिक साठवणुकीला चालना देणे, शेतकऱ्यांना गोदाम पावतीच्या आधारे सहज कर्ज उपलब्ध करून देणे आणि कृषी मालाच्या व्यापारात पारदर्शकता निर्माण करणे या उद्देशाने वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA Warehouse Inspection Agricultural Storage ) कार्यरत आहे. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने विविध योजना आणि धोरणे लागू केली असून, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या माध्यमातून मोठ्या क्षमतेची आधुनिक गोदामे उभारली जात आहेत. मात्र, या व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियमित गोदाम तपासणी, गुणवत्तेचे नियंत्रण, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. - [विदर्भ, मराठवाड्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती | Maharashtra Weather Monsoon Forecast Update](https://kisanwani.com/maharashtra-weather-monsoon-forecast-update/): किसानवाणी : राज्यात मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी-जास्त होत असतानाच पुढील (Maharashtra Weather Monsoon Forecast Update) तीन दिवसांसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. आजपासून राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. या कालावधीनंतर पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. - [मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ७९३.७९ कोटी निधी मंजूर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा | Maharashtra Solar Pump Scheme Agriculture](https://kisanwani.com/maharashtra-solar-pump-scheme-agriculture/): किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह आणि अखंडित वीजपुरवठा (Maharashtra Solar Pump Scheme Agriculture) उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या हिस्स्यापोटी ७९३.७९ कोटी रुपये इतका निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ऊर्जा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, हा निधी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. - [धान व मका उत्पादकांना मोठा दिलासा! १५७.३३ कोटींचे चुकारे खात्यात जमा होण्यास सुरुवात | Maharashtra Paddy Procurement](https://kisanwani.com/maharashtra-paddy-procurement/): किसानवाणी : रब्बी हंगामात शासकीय खरेदी केंद्रांवर धान आणि मका (Maharashtra Paddy Procurement) विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय खरेदी केंद्रांवर आपल्या शेतमालाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित चुकाऱ्यांच्या वितरणास अखेर सुरुवात झाली आहे. शासनाने धान खरेदीसाठी १४९ कोटी १३ लाख रुपये आणि मका खरेदीसाठी ८ कोटी २० लाख रुपये असा एकूण १५७ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, या निर्णयामुळे १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. - [द्राक्षातील भुरी रोगावर जैविक पद्धतीने करा प्रभावी नियंत्रण; ‘या’ सूचक झाडांवर ठेवा लक्ष | Grape Farming Powdery Mildew](https://kisanwani.com/grape-farming-powdery-mildew/): किसानवाणी : यंदाच्या हंगामात पावसामध्ये सातत्याने खंड पडत असल्यामुळे (Grape Farming Powdery Mildew) द्राक्ष बागांमधील रोग व्यवस्थापनाचे चित्र बदलताना दिसत आहे. मागील आठवड्यात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार याही आठवड्यात बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे कोकण किनारपट्टी आणि उत्तर कोकणातील घाटमाथा या भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक असून, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे काही हवामान मॉडेल्स दर्शवत आहेत. - [पॉलिहाउससाठी कोणता सांगाडा सर्वोत्तम? बांबू, लाकूड की GI पाइप? जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Polyhouse Farming Structure](https://kisanwani.com/polyhouse-farming-structure/): किसानवाणी : संरक्षित शेतीमध्ये पॉलिहाउस उभारणी करताना सर्वात (Polyhouse Farming Structure) महत्त्वाचा निर्णय म्हणजे त्याच्या सांगाड्यासाठी योग्य साहित्याची निवड होय. पॉलिहाउसची मजबुती, टिकाऊपणा, देखभाल खर्च, हवामानाचा प्रतिकार करण्याची क्षमता तसेच दीर्घकालीन उत्पादनक्षमता ही मोठ्या प्रमाणात सांगाड्यावर अवलंबून असते. त्यामुळे पॉलिहाउस उभारण्यापूर्वी उपलब्ध आर्थिक क्षमता, स्थानिक हवामान, पिकांचा प्रकार आणि भविष्यातील व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन सांगाड्याचे साहित्य निवडणे आवश्यक ठरते. - [पाऊस लांबल्याने कोणते पीक घ्यावे? उशिराच्या खरीपासाठी कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला | Delayed Monsoon](https://kisanwani.com/delayed-monsoon/): किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस (Delayed Monsoon) झालेला नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. विशेषतः सोयाबीन पेरणीचा कालावधी अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आता कोणत्या पिकांची निवड करावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळही अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. - [POCRA Scheme | कृषी व्यवसायासाठी 60% पर्यंत अनुदान; 1 कोटींच्या प्रकल्पांसाठी असा करा अर्ज](https://kisanwani.com/pocra-scheme/): किसानवाणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा (टप्पा-२) अंतर्गत कृषी व्यवसाय (POCRA Scheme) घटकाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महिला स्वयंसाह्यता बचत गट, गाव संघ, प्रभाग संघ, लोकसंचालित साधन केंद्र तसेच पेसा क्षेत्रातील ग्रामसभा आणि ग्रामपंचायती यांना कृषी व्यवसाय विकासासाठी आर्थिक साह्य उपलब्ध करून दिले जात आहे. अधिकाधिक पात्र संस्थांनी या योजनेचा लाभ घेऊन कृषी व्यवसायाची उभारणी करावी, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे. - [सणासुदीपूर्वी बेदाण्याच्या बाजारात तेजी; किती मिळतोय दर? | Raisin Prices Market](https://kisanwani.com/raisin-prices-market/): किसानवाणी : देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याला सातत्याने चांगली मागणी आणि (Raisin Prices Market) उठाव मिळत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर स्थिर राहिले आहेत. आगामी पंधरा ते वीस दिवसांत देशभरात विविध सण-उत्सवांना सुरुवात होणार असल्याने व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काळातही बेदाण्याचे दर टिकून राहतील, असा विश्वास बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. - [बांगलादेशच्या शुल्कवाढीने संत्रा निर्यात अडचणीत; विदर्भातील उत्पादकांची केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी | Orange Export Bangladesh Import Duty](https://kisanwani.com/orange-export-bangladesh-import-duty/): किसानवाणी : विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी यंदाचा मृग बहर उत्पादनाच्या दृष्टीने (Orange Export Bangladesh Import Duty) आशादायी मानला जात असला, तरी निर्यातीच्या आघाडीवर निर्माण झालेल्या अडचणींमुळे बागायतदार आणि निर्यातदारांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या मृग बहरासाठी पोषक हवामान असल्याने संत्र्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बांगलादेशकडून आयात शुल्कात करण्यात आलेली मोठी वाढ आणि नेपाळमधील बदललेल्या आयात धोरणांमुळे यंदाच्या हंगामात संत्रा निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेवरील ताण वाढण्याची भीती व्यक्त होत असून, या प्रश्नात केंद्र सरकारने राजनैतिक पातळीवर हस्तक्षेप करावा, अशी मागणी संत्रा उत्पादक आणि निर्यातदारांकडून केली जात आहे. - [Rain Alert Maharashtra Rain Forecast | राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा; ‘या’ 3 जिल्ह्यांना येलो अलर्ट, IMD चा अंदाज](https://kisanwani.com/rain-alert-maharashtra-rain-forecast/): किसानवाणी : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने (Rain Alert Maharashtra Rain Forecast) गुरुवार, १६ जुलै रोजी राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - [Farmer ID 2026: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी Farmer ID अनिवार्य? मोफत नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे | Farmer ID 2026 Agristack Maharashtra](https://kisanwani.com/farmer-id-2026-agristack-maharashtra/): किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाने (Farmer ID 2026 Agristack Maharashtra) उपक्रमाअंतर्गत Farmer ID अर्थात शेतकरी ओळखपत्र प्रणाली सुरू केली आहे. 15 एप्रिल 2025 पासून अनेक शासकीय कृषी योजनांसाठी Farmer ID महत्त्वाचा घटक ठरला असून, आगामी काळात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक असणार आहे. Farmer ID मुळे शेतकऱ्यांची जमीन, पीक आणि बँक खात्याची माहिती एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने मिळण्यास मदत होते. - [शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! ७.५ HP पर्यंतचे ₹४८ हजार कोटींचे जुने वीज बिल माफ; दिवसा १२ तास मोफत वीज | Maharashtra Farmers Agriculture Electricity Bill](https://kisanwani.com/maharashtra-farmers-agriculture-electricity-bill/): किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषी वीज बिलासंदर्भात (Maharashtra Farmers Agriculture Electricity Bill) महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील ७.५ हॉर्स पॉवर (एचपी) पर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचे प्रलंबित जुने वीज बिल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर भविष्यात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. - [सोयाबीन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून बियाण्यांची मदत | Maharashtra Farmers Soybean Re Sowing](https://kisanwani.com/maharashtra-farmers-soybean-re-sowing/): किसानवाणी : राज्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे (Maharashtra Farmers Soybean Re Sowing) नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सोयाबीन तसेच काही भागात कापसाचे पीक उगवले नाही. त्यातच अनेक भागांमध्ये पावसानेही पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुबार पेरणी करावी लागणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन व विकास परिषद (DPDC) निधीतून उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. - [शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (AIF) योजनेच्या विशेष मोहिमेला सुरुवात | Agriculture Infrastructure Fund AIF Scheme](https://kisanwani.com/agriculture-infrastructure-fund-aif-scheme/): किसानवाणी : राज्यात कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (Agriculture Infrastructure Fund AIF Scheme) योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेला गती देण्यात आली आहे. १९ जून ते २० जुलै या कालावधीत राज्यभर ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यावर भर दिला जात आहे. - [देशातील खरीप पेरणी 16% पिछाडीवर; सोयाबीन, भुईमूग, डाळी आणि कापूस पिकांची चिंता वाढली | Kharif Sowing India Agriculture](https://kisanwani.com/kharif-sowing-india-agriculture/): किसानवाणी : देशभरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांच्या (Kharif Sowing India Agriculture) पेरण्यांना वेग मिळाला असला, तरीही यंदाच्या हंगामातील पेरणी अद्यापही गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. जूनअखेरीस खरीप पेरणीतील तूट सुमारे २१ टक्के होती. त्यानंतर झालेल्या पावसामुळे पेरणीला काही प्रमाणात गती मिळाली असली तरी १० जुलैअखेर ही तूट अजूनही सुमारे १६ टक्क्यांच्या आसपास कायम आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनाबाबतची चिंता अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. - [नोव्हेंबरमध्ये ‘एल निनो’चा सर्वाधिक प्रभाव; महाराष्ट्राच्या पावसाबाबत मोठा अंदाज | El Nino 2026 NOAA](https://kisanwani.com/el-nino-2026-noaa/): किसानवाणी : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची तीव्रता सातत्याने वाढत असून, येत्या नोव्हेंबर महिन्यात हा हवामानाचा प्रभाव सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या हवामानशास्त्र विभागाच्या ‘नोआ’ (El Nino 2026 NOAA) अंतर्गत कार्यरत असलेल्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (CPC) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालानुसार, यंदाचा ‘एल निनो’ पुढील वर्षीच्या वसंत ऋतूच्या प्रारंभी म्हणजेच मार्च २०२७ पर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता असून, त्यानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे. - [सफेद मुसळी लागवड कशी करावी? कमी क्षेत्रात जास्त नफा देणाऱ्या औषधी पिकाची ‘संपूर्ण’ माहिती | White Musli Farming](https://kisanwani.com/white-musli-farming/): किसानवाणी : सफेद मुसळी हे भारतातील महत्त्वाचे औषधी पीक (White Musli Farming) मानले जाते. आयुर्वेद, औषधनिर्मिती तसेच आरोग्यवर्धक उत्पादनांमध्ये या पिकाच्या मुळांना मोठी मागणी असल्यामुळे अलिकडच्या काळात अनेक शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच सफेद मुसळीची लागवड करण्याकडे वळत आहेत. कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असल्यामुळे हे पीक व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत आहे. योग्य नियोजन, दर्जेदार लागवड साहित्य आणि वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन केल्यास या पिकातून चांगला नफा मिळू शकतो. - [३० जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी! २ लाखांपर्यंत कर्ज माफ, सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver 2026](https://kisanwani.com/maharashtra-farm-loan-waiver-2026/): किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी (Maharashtra Farm Loan Waiver 2026) समोर आली आहे. राज्य सरकारकडून यापूर्वी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, कर्जमाफी योजनेतील काही निकषांमध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे ही प्रक्रिया काही काळ लांबली. आता या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांना ३० जुलैपूर्वी किंवा त्याही अगोदर कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. - [फळभाज्यांचा कचरा नाही, तर अब्जावधी रुपयांची संधी! ग्रीन बायोरिफायनरी बदलणार शेतकऱ्यांचे भविष्य | Green Biorefinery](https://kisanwani.com/green-biorefinery/): किसानवाणी : भारताने हरितक्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता (Green Biorefinery) मिळवली आणि त्यानंतर फळे व भाजीपाला उत्पादनातही मोठी झेप घेतली. आज भारत हा जगातील प्रमुख फळे आणि भाजीपाला उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र उत्पादन वाढत असताना उत्पादनोत्तर नुकसानीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेतातून निघालेली प्रत्येक फळभाजी ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. काही फळे झाडाखाली पडतात, काही आकारमान किंवा गुणवत्तेमुळे बाजारात नाकारली जातात, काही वाहतुकीदरम्यान खराब होतात, तर काही बाजारात विक्री न झाल्यामुळे वाया जातात. - [महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट | Maharashtra weather IMD forecast Yellow alert](https://kisanwani.com/maharashtra-weather-imd-forecast-yellow-alert/): किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा (Maharashtra weather IMD forecast Yellow alert) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून नागरिकांसह शेतकऱ्यांनाही उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, वातावरणात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने भारतीय हवामान विभागाने आज (ता. १५) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. - [नाबार्डमुळे १७६ कृषी व ग्रामीण उत्पादनांना GI Tag; १३ हजार उत्पादकांना मोठा फायदा | NABARD GI Tag Geographical Indication](https://kisanwani.com/nabard-gi-tag-geographical-indication/): किसानवाणी : देशातील पारंपरिक कृषी आणि ग्रामीण उत्पादनांना जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळावी, स्थानिक उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, या उद्देशाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (NABARD GI Tag Geographical Indication ) महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत देशातील शेती आणि ग्रामीण भागाशी संबंधित तब्बल १७६ उत्पादनांना भौगोलिक मानांकन अर्थात जीआय (Geographical Indication) प्राप्त झाले आहे. या उपक्रमामुळे शेतकरी, कारागीर, स्वयं-सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच विविध ग्रामीण उत्पादकांसाठी व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होणार असून, १३ हजारांहून अधिक उत्पादकांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - [Coco Peat GST | कोकोपीटलाही जीएसटीमुक्त करा; वाढत्या किमतींमुळे नर्सरी उद्योग संकटात](https://kisanwani.com/coco-peat-gst/): किसानवाणी : सर्व प्रकारच्या बियाण्यांप्रमाणे कोकोपीटलाही वस्तू व सेवा कर (Coco Peat GST) मधून सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशनने राज्य शासनाकडे केली आहे. गेल्या काही वर्षांत कोकोपीटच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ, देशांतर्गत उपलब्धतेतील घट आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे नर्सरी उद्योगावर आर्थिक ताण वाढत असल्याचे असोसिएशनने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. यामुळे रोपांच्या किमती वाढत असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. - [आता प्रयोगशाळेची गरज नाही! सेन्सरद्वारे शेतातच होणार माती परीक्षण; पाणी, खत आणि खर्चात मोठी बचत | Soil Testing Sensor Technology](https://kisanwani.com/soil-testing-sensor-technology/): किसानवाणी : निरोगी आणि सुपीक माती ही शाश्वत शेतीचा पाया मानली जाते. मातीचे आरोग्य चांगले असेल तर पिकांची वाढ, उत्पादन (Soil Testing Sensor Technology) आणि गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा होते. मातीची योग्य भौतिक रचना, सेंद्रिय कर्बाचे पुरेसे प्रमाण, उपयुक्त सूक्ष्मजीवांची सक्रियता, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आणि आवश्यक पोषकद्रव्यांचा संतुलित पुरवठा या सर्व गोष्टी मातीच्या आरोग्यावर अवलंबून असतात. त्यामुळे शेती अधिक उत्पादक आणि पर्यावरणपूरक बनते. - [पेरणीनंतर पावसाचा खंड पडला? मग पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा ‘हे’ उपाय |Dry Spell After Sowing](https://kisanwani.com/dry-spell-after-sowing/): किसानवाणी : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्यानंतर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची कामे (Dry Spell After Sowing) पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर अनेक ठिकाणी पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन उगवण, वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनातील घट मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते. - [शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतजमिनीच्या शर्तभंगाबाबत सरकारचा मोठा निर्णय | Agricultural Land](https://kisanwani.com/agricultural-land/): किसानवाणी : राज्यातील शेतजमीनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतजमिनींच्या शर्तभंगाबाबत (Agricultural Land) महत्त्वाचे स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या शर्तभंगासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर या निर्णयामुळे स्पष्टता आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित शेतजमिनीचे भूतकाळात कितीही वेळा सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरण झाले असले, तरी आता केवळ शेवटचा शर्तभंग विचारात घेऊन तो नियमित करण्यात येणार आहे. - [पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात पशुधन प्रजनन धोरणात मोठे बदल; स्थानिक गोवंश संवर्धनावर भर | Maharashtra Livestock Breeding Policy](https://kisanwani.com/maharashtra-livestock-breeding-policy/): किसानवाणी : महाराष्ट्रातील पशुधन विकास अधिक वैज्ञानिक, शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीशी ( Maharashtra Livestock Breeding Policy) सुसंगत करण्यासाठी राज्यात पशुधन प्रजनन धोरण अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः स्थानिक गोवंश आणि म्हैसवंशाच्या आनुवंशिक गुणवत्तेचे जतन, उत्पादनक्षमता वाढविणे आणि भविष्यातील प्रजननातील अडचणी कमी करणे या उद्देशाने विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. कृत्रिम रेतन (Artificial Insemination) आणि वीर्य संकलन केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार स्थानिक वळूंची निवड करून त्यांचा अधिक प्रभावी वापर करण्यावर या धोरणात विशेष भर देण्यात आला आहे. - [Monsoon Rain | राज्यात पावसाला पोषक हवामान; ‘या’ जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता](https://kisanwani.com/monsoon-rain/): किसानवाणी : राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला तरी पावसाला पोषक (Monsoon Rain) हवामान तयार होत असल्याचे चित्र आहे. अनेक भागांत पावसाने तात्पुरती उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून कमाल तापमान काही ठिकाणी ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने मंगळवार (ता. १४) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप कायम राहण्याचा, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. - [सोयाबीन उत्पादकांसाठी मोठी सूचना! ‘एल निनो’ परिस्थितीत असे करा पीक व्यवस्थापन | Soybean Crop Management](https://kisanwani.com/soybean-crop-management/): किसानवाणी : राज्यातील एकूण सोयाबीन क्षेत्रापैकी ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भ (Soybean Crop Management) या दोन विभागांत आहे. या भागातील बहुतांश शेती पूर्णपणे नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसातील चढ-उतारांचा थेट परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर होतो. विशेषतः लातूर, नांदेड, जालना, अमरावती, अकोला आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. यंदा ‘एल निनो’ परिस्थितीमुळे मॉन्सूनचा पाऊस कमी पडण्याची तसेच पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरडवाहू सोयाबीन उत्पादकांनी नियोजनबद्ध पद्धतीने शेती करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. - [द्राक्ष बागेत बुरशीजन्य की जिवाणूजन्य करपा? चुकीची फवारणी टाळण्यासाठी जाणून घ्या ‘हा’ फरक | Grape Disease Management](https://kisanwani.com/grape-disease-management/): किसानवाणी : द्राक्ष उत्पादकांसाठी पावसाळ्याचा कालावधी हा रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने(Grape Disease Management) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील बहुतांश द्राक्ष पट्ट्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरड छाटणीला साधारण तीन महिने पूर्ण झालेले असतात. याच अवस्थेत द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य करपा आणि जिवाणूजन्य करपा या दोन प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. या दोन्ही रोगांची सुरुवातीची लक्षणे काही प्रमाणात एकसारखी दिसत असल्याने अनेक शेतकरी संभ्रमात पडतात. परिणामी चुकीच्या बुरशीनाशकांचा वापर होऊन उत्पादन खर्च वाढतो, मात्र अपेक्षित रोग नियंत्रण मिळत नाही. त्यामुळे रोगाची योग्य ओळख करून त्यानुसार व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. ## Pages - [Web-stories](https://kisanwani.com/web-stories/) - [Privacy Policy](https://kisanwani.com/privacy-policy-2/): Kisanwani is strongly committed to your right to privacy. We have put in place appropriate procedures to safeguard and help prevent unauthorized access, maintain data security, and correctly use the information we collect online. The information we collect in connection with our online forums and communities is used to provide an interactive experience. We use this information to facilitate participation in these online forums and communities from time to time.