Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
योजना

Plastic Mulching Subsidy: प्लास्टिक मल्चिंगवर 50% अनुदान; भरघोस उत्पादनासाठी या योजनेचा लाभ घ्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग (Plastic Mulching Subsidy) अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. तण नियंत्रण, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, किडी आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करणे, जमिनीची धूप रोखणे असे अनेक फायदे असलेले प्लास्टिक मल्चिंग आता सरकारी अनुदानामुळे शेतकऱ्यांसाठी अधिक परवडणारे झाले आहे.

योजनेचे फायदे:

 • अनुदान: या योजनेत शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंगसाठी 50% पर्यंत अनुदान मिळते.
 • पाणी आणि खताची बचत: प्लास्टिक मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि पाण्याचा वापर कमी होतो. त्यामुळे खताचा वापरही कमी होतो.
 • उत्पादनात वाढ: प्लास्टिक मल्चिंगमुळे तणांची वाढ कमी होते आणि पिकांना पोषकद्रव्ये अधिक प्रमाणात उपलब्ध होतात. यामुळे पिकाची उत्पादकता वाढते.
 • जमिनीची धूप रोखणे: प्लास्टिक मल्चिंगमुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत होते.
 • किडी आणि रोगांपासून संरक्षण: प्लास्टिक मल्चिंगमुळे जमिनीतील किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

पात्रता:

 • शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह आणि सहकारी संस्था या योजनेसाठी पात्र आहेत.
 • शेतकऱ्यांकडे 7/12 उतारा, 8-अ प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया:

 • राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
 • अर्ज जमा करावा.

अधिक माहितीसाठी:

 • कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

विविध पिकांकरिता वापरायची मल्चिंग फिल्म

 • ज्या पिकांना 11 ते 12  महिने कालावधी लागतो. म्हणजे उदाहरणार्थ पपई यांसारख्या फळपिकांना 50 मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
 • 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या पिकांसाठी म्हणजेच उदाहरणार्थ भाजीपाला, स्ट्रॉबेरी इत्यादींसाठी 25 मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म वापरली जाते.
 • जास्त कालावधी घेणारी पिके म्हणजेच 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेणाऱ्या सर्व पिकांसाठी 100 किंवा 200 मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरली जाते.

या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या पिकाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button