Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
योजनाबातम्या

पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट! आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 6000 रुपये! PM Kisan Nidhi Yojana

किसानवाणी | देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये दिले जातात, मात्र या रकमेचा लाभ पात्र शेतकरी कशाप्रकारे घेतात, याची माहिती शासनाला मिळत नाही. यामुळेच सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत.

पीएम किसानच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याशिवाय, अशा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 6000 रुपयांच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.

PM Kisan Nidhi Yojana (पीएम किसान) योजनेसंदर्भात मोठी अपडेट! 

पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेतील फसवणूक (Fraud) टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी किंवा एनपीसीआय तसेच जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. ही मोहीम किसान क्रेडिट कार्ड (KCC) खातेधारक नसलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेशी जोडण्याची तयारी सुरू आहे. यासाठी सर्व कृषी समन्वयक आणि शेतकरी सल्लागारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 6000 रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) शासनाकडून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये दिले जातात, मात्र या रकमेचा लाभ लाभार्थी पात्र शेतकरी कसा घेत आहेत, याची माहिती शासनाला मिळत नाही. या परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) नाही, अशा शेतकऱ्यांचा किसान क्रेडीट कार्ड तसेच या योजनेंतर्गत बँकेकडून कर्जही दिले जाईल.

पीएम किसान योजनेच्या सोळावा हप्ता कधी मिळणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी किंवा एएनपीसीआय केलेले नाही, त्यांनी हे काम लवकरात लवकर करुन घेणे गरजेचे आहे. ई-केवायसी किंवा एएनपीसीआय न केलेल्या शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी PM Kisan योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे.

Back to top button