75 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून 'या' तरूणीने गावी शेतीत काम करण्याचा निर्णय घेतला!

काव्या दातखिळे ही पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील  असून तिने बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे

बीएससी नर्सिंग पूर्ण झाल्यानंतर काव्याने टाटा रुग्णालय,  सायन हॉस्पिटल अशा ठिकाणी नोकरी केली.

नोकरीत समाधान नसल्याने दीड वर्षांपूर्वी  75 हजार पगाराची नोकरी सोडून गावी मातीत काम करण्याचा निर्णय घेतला.

गावी वडिलोपार्जित जमिनीत रासायनिक खतांचा वापर करण्यात येत होता पण, ते करताना मातीखालील सूक्ष्मजीवांबाबत  विचार केला जात नसल्याचं काव्याच्या लक्षात आलं.

कुणाचं तरी पोट भरायचं म्हणून उत्पन्न काढायचं आणि आपल्या खिशात पैसे यावेत हे धोरण ठेवून आपण काम करतो... आणि हेच चित्र बदलावं असं काव्याला वाटत होतं.

त्यानंतर, काव्यानं जीवाणू आणि बुरशींना एकत्र घेऊन काम करायचं ठरवलं आणि गावाकडे गांडूळ खत निर्मितीसाठी शेड उभारून स्वत:चा प्रकल्प उभा केला.

Chat Box
Phone

7977021267 / 7021900702

गांडूळ खत तयार केलं परंतु ते विकणं इतक सोपं नसल्याची जाणीव काव्याला सुरवातीच्या काही महिन्यातच झाली.

पहिले अडीच महिने इतके वाईट गेले की, अडीच टन माल तयार होता पण तो विकला जात नव्हता. त्यामुळे पुन्हा नोकरी करावी असे वाटू लागले.

Chat Box
Phone

7977021267 / 7021900702

परंतु काव्याने हार न मानता ज्या प्रामाणिकतेने काम करायला सुरुवात केली त्याच प्रामाणिकतेने लोकांना सांगायचे या विचाराने आपल्या युट्यूब चॅनेलवर 15 मिनिटांचा व्हीडिओ अपलोड केला.

व्हीडिओ अपलोड केल्यानंतर तिथूनच 5 टनाची पहिली ऑर्डर तीही एकाच शेतकऱ्याकडून मिळाली, त्यामुळे काव्याचा आत्मविश्वास दुणावला. 

काव्याने गांडूळ खताबरोबरच वर्मिवॉश, गांडूळ बीज उत्पादन घ्यायला सुरुवात केली असून दोन महिन्यांत एक बॅच विक्रीसाठी तयार होते.

प्रत्येक बॅचला साधारणपणे 15 टन माल तयार होतो, त्यातून खर्च वजा जाता दीड लाख प्रॉफिट मिळतं. तर वर्मिवॉशमध्ये 100 % प्रॉफिट मिळतं

Chat Box
Phone

7977021267 / 7021900702

यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काव्या सक्रिय असून इथूनच तिला मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात.

काव्याचे पती राजेश हे मेकॅनिकल इंजीनियर आहेत. पत्नीच्या कामात तिची साथ देण्यासाठी त्यांनीही 6 महिन्यांपूर्वी नोकरी सोडली आहे.

काव्याला सुरवातीला कामाचा खूप लोड येत होता. शेती, प्रोजेक्ट, कार्यशाळा सांभाळण्यास आता पतीचा हातभार लागल्याने आता तिला झोकून देऊन काम करता येते.

Chat Box
Phone

7977021267 / 7021900702

सध्या गांडूळ खताला मागणी जास्त, पण उत्पादन कमी अशी अवस्था  आहे, त्यामुळे यात रोजगाराच्या चांगल्या संधी असल्याचं काव्या सांगते.

शेतीत प्रशिक्षण घेऊन पाऊल टाकलं, तर शेतीतून पैसा, प्रतिष्ठा आणि समाधान हमखास मिळतं असल्याचं काव्याचं ठाम मत आहे.

शेतकरी बंधूनो काव्याचा हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला आवडला असल्यास इतरांना शेअर करायला विसरू नका!