पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या रामकुंड - वरकुटे खुर्द येथील आशिष प्रल्हाद शेंडे यांनी ड्रॅगन फ्रुट शेतीतून भरघोस नफा कमवला आहे.

आशिष यांची 30 एकर शेती आहे. व्यावसायिक वृत्तीतून त्यांनी फळपीक आधारित पद्धतीचा स्वीकार केला आहे.

मित्रांकडून ड्रॅगन फ्रूट शेती व मार्केटबाबत माहिती घेत प्रयोगशील आशिष यांनी हे पीक घेण्याचे धाडस केले.

आशिष यांनी अठरा एकरांत पेरू हे  मुख्य फळपीक घेतले आहे. तर तीन एकरांत सीताफळ लागवड केली आहे.

आशिष यांनी सुरुवातीला चार एकरांत 1 जानेवारी 2022 मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. 

आशिष यांना राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानातून मदत मिळाली व तालुका कृषी अधिकारी बी. एस. रूपनवर यांचे मार्गदर्शन लाभले.

आशिष यांना पहिल्या लागवडीतून एकरी दीड टना प्रमाणे 4 एकरातून एकूण सहा टन उत्पादन मिळाले.

आशिष यांनी ऑक्टोबर 2022, 2023 मध्ये पुन्हा दोन-दोन एकर अशी आजमितीला एकूण आठ एकर क्षेत्रावर लागवड केली आहे.

अन्य फळ पिकांना नैसर्गिक आपत्ती आणि दरांचा मोठा फटका बसतो. मात्र ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत चांगला दर मिळतो.

फळपिकांतील सुमारे वीस वर्षांचा अनुभव पाहता ड्रॅगन फ्रूट देखभाल खर्च, दर व मागणी याबाबत फायदेशीर वाटत असल्याचा आशिष यांचा अनुभव आहे.

या पिकाला निचऱ्याची जमीन मानवते. तर सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त म्हणजे एकरी आठ लाखांपर्यंत येतो.

सिमेंट खांब, सिमेंट प्लेट, ठिबक सिंचन, रोपे, सावलीसाठी शेडनेट, लागवड आदींसाठी जास्त खर्च येतो.

चालू वर्षी प्रति किलो 80 रुपयांपासून 160 रुपयांपर्यंत दर मिळाले. तर एकरी 14 टन उत्पादन निघाले.

ड्रॅगन फ्रूटला सर्वाधिक मागणी मुंबई, पुणे बाजारपेठेतून आहे. तर केरळ येथील व्यापाऱी देखील जागेवर येऊन खरेदी करतात.