मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जात असून मसाला पिकांचा राजा संबोधतात

जाग‍तिक बाजारपेठेत काळ्या मिरीची 90 टक्‍के निर्यात एकटया भारतातून होते.

मिरीची लागवड आंबा फणस यासारख्‍या झाडांवर तसेच नारळ सुपारीच्‍या बागांमध्‍ये करता येते.

काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते.

 मे- जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि 6 ते 8 महिन्यात हे तुरे पक्व होतात.

 जानेवारी ते मार्च या कालावधीत हिरव्या घडातील एक- दोन दाण्यांचा रंग पिवळा अगर नारिंगी होताच घड तोडावेत

काळी मिरी तयार करण्यासाठी पिकलेले दाणे बांबूच्या करंडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्‍यात गुंडाळावेत.

करंडी अगर फडक्‍यात गुंडाळलेल्या मिरीचे दाणे उकळत्या पाण्यात सुमारे एक मिनीट बुडवून काढावे. 

उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके अंथरूण त्यावर वाळवावी.

पन्नीयूर- 1 जातीच्या वेलापासून सरासरी 5 ते 6 किलो हिरवी मिरी आणि ही मिरी वाळल्यानंतर दीड ते दोन किलो होते.

काळ्या मिरीला सध्याच्या बाजाराभावाप्रमाणे प्रति क्विंटलला 60 ते 85 हजार रूपये दर मिळतो