प्रत्येक भारतीयांच्या घरात लोणचे हा जेवणातील महत्वाचा घटक मानला जातो

त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यांना वर्षभर मोठी मागणी असते

लोणची बनवण्याचा व्यवसाय घरबसल्या अगदी कमी भांडवलात सहज करता येतो

सुरूवातीला अगदी 10 हजार रूपयांच्या गुंतवणूकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता

यातून तुम्ही दरमहा किमान 30 ते 35 हजार रुपये सहज कमवू शकता.

हा व्यवसाय अगदी 10x10च्या रूममध्ये देखील सुरू करणे शक्य आहे.

तयार झालेले लोणचे ऑनलाइन, घाऊक बाजार, किंवा किरकोळ विक्री करू शकता

हा व्यवसायासाठी, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून परवाना घ्यावा लागतो.

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होतो. 

 मागणी वाढल्यानंतर घरगुती स्वरूपाचा हा व्यवसाय मोठ्या उद्योगात बदलता येतो.

म्हणूनच अवघ्या 10 हजारात सुरू केलेला व्यवसाय तुम्हाला भविष्यात मोठे व्यावसायिक बनवू शकतो