तुम्हाला चांगला नफा कमवायचा असेल तर तुम्ही तितर पालन करू शकता.

भारतासह इतर देशांमध्ये तितराच्या मांसाला चांगली मागणी आहे. 

 हिवाळ्यात तितराच्या अंडी आणि मांसाला अधिक मागणी असते.

तीतर एका वर्षात 300 पेक्षा जास्त अंडी घालते.  ते वयाच्या 40-50 दिवसातच अंडी द्यायला सुरवात करते.

अंड्यांमध्ये कर्बोदके, प्रथिने, चरबी आणि खनिजे अधिक आढळतात. त्यामुळे कोंबडीच्या तुलनेत जास्त किंमतीला विकली जातात.

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत सरकारने त्यांच्या शिकारीवर बंदी घातली आहे. 

तितर पालनासाठी शासनाकडून रितसर परवाना घ्यावा लागतो, परवान्याशिवाय तितराचे पालन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

तितरचा संगोपन खर्च कमी असल्याने यांच्या संगोपनातून कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो.

कुक्कुटपालनाप्रमाणे तीतर पालन उत्पन्नाचा चांगला स्रोत बनू शकतो. आपल्याकडे कादंबरी, चितांबरी आणि श्वेतांबरी अशा प्रमुख प्रजाती आहेत.

 तितर मूळ आफ्रिका & युरोपमध्ये आढळतो. आता आपल्या देशातही कुक्कुटपालनासाठी योग्य मानला जातो.

 सेंट्रल बर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, बरेली येथील तज्ज्ञांच्या मते, लेयर आणि ब्रॉयलर कोंबड्यांपेक्षा  तितर पक्ष्यांना रोग होण्याची शक्यता कमी असते.

तीतराचे सरासरी वजन सुमारे 300 ग्रॅम असते. तितर पक्षी बाजारात 300 ते 500 रुपयांना सहज विकला जातो.

तितराच्या अंड्याची ऑनलाईन किंमत सध्याच्या घडीला 20 ते 25 रूपये प्रतिनग आहे. त्यामुळे तितर पालन नक्कीच फायदेशिर आहे.