जगात अशा कोंबड्याची एक जात आहे ज्याचा कोंबडा दीड लाखापेक्षा अधिक किंमतीला विकला जातो.

‘डॉन्ग टाओ’ असे या कोंबड्याचे नाव असून त्याची किंमत ऐकून तुमच्याही तोंडचे पाणी पळाले असेल

व्हिएतनाम या देशामध्ये पाळला जाणारा हा कोंबडा ‘ड्रॅगन चिकन’ नावाने देखील ओळखला जातो.

व्हिएतनामची राजधानी हनोई या ठिकाणी त्याच्या पालनाचा व्यवसाय (Poultry Farming) सर्वप्रथम सुरु झाला.

या कोंबड्याची विशेषतः म्हणजे त्याचे पाय हे सामान्य कोंबड्यापेक्षा खूप जाड असतात. त्यांचा रंग लाल असतो.

‘डॉन्ग टाओ’ चे सामान्यतः वजन 10 किलोपर्यंत असते. याशिवाय त्याच्या चिकनमध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते.

इतर कोंबड्यांच्या तुलनेत ‘डॉन्ग टाओ’ कोंबड्याच्या मांसामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात.

व्हिएतनाम मध्ये ‘लूनर न्यू ईयर’ या मुख्य सणाला ‘डॉन्ग टाओ’ कोंबड्याच्या चिकनला मोठी मागणी असते.

सध्या या कोंबड्याची किंमत 1,65,000 रुपये इतकी असली तरी ग्राहक त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

भारतात सध्या तरी या कोंबड्याच्या पालनाबाबत लोकांमध्ये माहितीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. 

जर तुम्हालाही ‘डॉन्ग टाओ’चा पोल्ट्री व्यवसाय करायचा असेल तर त्याची पिल्ले व्हिएतनाममधून आणावी लागतील.

त्यानंतर सामान्य कोंबड्यांप्रमाणे, आपण पोल्ट्री फार्ममध्ये त्याचे संगोपन सुरू करू शकता.

भारतात याची बाजारपेठ फारशी माहिती नसली तरी एक्सपोर्टच्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.