कोल्हापूरच्या शेतकऱ्यानं एका गुंठ्यात तब्बल 3 टन ऊसाचं उत्पादन घेत अनोखी कामगिरी केली आहे.

या शेतकऱ्यानं तब्बल 18 गुंठ्यात 57 टन ऊसाचे उत्पादन घेतलं आहे.

उदय पाटील असं या युवा शेतकऱ्याचं नाव असून ते पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील रहिवासी आहेत.

उदय यांनी भुईमूग, मिरची, मेथी या ऊसातील आंतरपिकांतून सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.

उदय यांना 50 हजार रुपये खर्च वगळता सुमारे अडीच लाख रुपये 18 गुंठ्यात निव्वळ नफा मिळाला आहे.

उदय यांनी सुरुवातीला 18 गुंठ्यात 10 ट्रॉली शेणखत घालून उभीआडवी नांगरणी करून चार फुटाची सरी सोडली.

त्यानंतर 30 ऑगस्ट 2022 रोजी 86032 या जातीच्या ऊसाची दीड फूटावरती एकडोळा पद्धतीनं लागवड केली.

ठिबक सिंचनानं पाणीपुरवठा करत भरणीपर्यंत नॅनोटेक हायटेक, बायोजेम याच्या दोन महिने आळवण्या केल्या.

15 महिन्यात ऊसामध्ये तणनाशकाचा वापर न करता वारंवार पावरटिलरनं नांगरणी करून भांगलण केली.