शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

स्वीडनच्या वैज्ञानिकांनी Electronic Soil तयार करून नवीन क्रांती  केली आहे.

ही माती म्हणजे एक मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशन आहे. जे रोपांना अन्न पुरवतं. 

यामध्ये पिकांची वाढ 50 टक्के अधिक होत असल्याचा दावा संशोधक करत आहेत.

लिंकपिंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केलं आहे.

मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशनमध्ये  शेती करण्याच्या या प्रक्रियेला हायड्रोपोनिक्स म्हटलं जातं.

सोल्यूशनमध्ये थेट पिकांची वाढ केली जाते. हे अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी वीज वापरली जाते

पिकांना पोषक तत्वं ही थेट मिनरल न्यूट्रियंट सोल्यूशनमधून देण्यात येतात. यासाठी पिकांना एका विशिष्ट प्रकारच्या सबस्ट्रेटवर लावलं जातं.

या सबस्ट्रेटमध्ये वीज प्रवाह सोडून अ‍ॅक्टिव्हेट केलं जातं. यामुळे रोपं झोपेतही वेगाने मुळांमधून पोषक द्रव्ये शोषून घेतात.

जर्नल प्रोसिडिंग्स ऑफ दि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात याबाबत संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

इलेक्ट्रॉनिक मातीचा वापर केल्यामुळे पिकं अवघ्या 15 दिवसांमध्ये 50 टक्के अधिक वाढतात.

या टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणजे, यामध्ये शेती करण्यासाठी भरपूर जागेची आवश्यकता नाही. 

मातीचीच गरज नसल्यामुळे उभ्या टॉवर्समध्येही भाजीपाला पिकवला जाऊ शकतो.

यामुळे एखाद्या छोट्या टेरेसवर देखील भरपूर प्रमाणात पीक घेतलं जाऊ शकतं.