‘प्रधानमंत्री जी-वन’ योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतातील अवशेषांपासून मिळेल फायदेशीर उत्पन्न! Pradhan Mantri JI-VAN Yojana
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय (Pradhan Mantri JI-VAN Yojana) मंत्रिमंडळाने सुधारित प्रधानमंत्री जी-वन योजनेला मंजूरी दिली. जैव-इंधनाच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींबाबत ताळमेळ राखण्यासाठी आणि अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही योजना (Pradhan Mantri JI-VAN Yojana) असून याद्वारे शेतकर्यांना त्यांच्या शेतीच्या अवशेषांसाठी (Agriculture Residue) फायदेशीर उत्पन्न सुद्धा मिळणार आहे.
किसानवाणी | प्रधानमंत्री जी-वन योजना (Pradhan Mantri JI-VAN Yojana) देशाच्या ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, पर्यावरणीय प्रदूषण नियंत्रण आणि देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे.
Pradhan Mantri JI-VAN Yojana योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:
- शेतकऱ्यांना फायदा: योजनेतंर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या अवशेषांची विक्री करून चांगले उत्पन्न मिळेल. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
- स्थानिक रोजगार: या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
- पर्यावरण संरक्षण: जैव इंधन वापरण्यामुळे पर्यावरणीय प्रदूषण कमी होईल.
- ऊर्जा सुरक्षा: देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यात आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यात या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.
- प्रगत तंत्रज्ञान: योजना प्रगत जैव इंधन तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देते.
- मेक इन इंडिया: या योजनेमुळे देशात जैव इंधन उत्पादन वाढेल आणि मेक इन इंडिया मोहिमेला बळ मिळेल.
- निव्वळ शून्य उत्सर्जन: 2070 पर्यंत देशाला निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
प्रधानमंत्री जी-वन योजना अंमलबजावणी:
- योजना अंमलबजावणीसाठी पाच वर्षांची म्हणजे 2028-29 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
- या योजनेत कृषी आणि वनीकरणाचे अवशेष, औद्योगिक कचरा, सिंथेसिस वायू, शेवाळ इत्यादी सारख्या लिग्नोसेल्युलोसिक फीडस्टॉक्सपासून उत्पादित प्रगत जैवइंधनचा समावेश होतो.
पहिला 2G इथेनॉल प्रकल्प:
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पानिपत, हरियाणा येथे स्थापित पहिला 2G इथेनॉल प्रकल्प ऑगस्ट 2022 मध्ये पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला आहे.
- इतर 2G व्यावसायिक प्रकल्प BPCL, HPCL आणि NRL द्वारे बरगड (ओडिशा), भटिंडा (पंजाब) आणि नुमालीगढ (आसाम) येथे उभारले जात आहेत.