Vihir Anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ; जाणून घ्या किती मिळणार अनुदान!

किसानवाणी | राज्यातील शेतकऱ्यांना आता सिंचन विहिरीसाठी अधिकचे अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असून यासाठी विविध योजना देखील राबवत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) देखील अशीच एक महत्वाकांक्षी योजना (Vihir Anudan Yojana) आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान (Vihir Anudan Yojana) दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून पूर्वी सिंचन विहिरीसाठी चार लाख रूपयांपर्यंतचे अनुदान दिले जात होते. मात्र आता अनुदानाची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत (Government Scheme) दिल्या जाणाऱ्या अनुदानात एक लाख रूपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी साठी आता लाभार्थी शेतकऱ्यांस पाच लाख रूपयांचे अनुदान (Vihir Anudan Yojana) मिळणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल 2024 पासून होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे शेतीकामांसहित सर्वच कामांचे मजुरीचे दर वाढले आहेत. यामुळे सद्यःस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे.

बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार व केंद्र सरकारच्या 1 एप्रिल 2024 पासून मनरेगांतर्गत लागू झालेले मजुरी दर रक्कम 297 रुपये प्रतिदिन विचारात घेऊन, सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम 4 लाख 99 हजार 403 रुपये एवढे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.