किसानवाणी | केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर युनिक आयडी’ (ॲग्री स्टॅक – Agri stack Scheme) तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची माहिती आधार कार्डशी संलग्न करावी लागणार आहे. याशिवाय, पीएम किसान, पीक विमा आणि इतर कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे काम सुरू झाले आहे. एकूण एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक दिला जाणार असून, हा क्रमांक भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधित सेवांसाठी उपयोगी ठरणार आहे.
फार्मर आयडीचे फायदे: Agri stack Scheme
- केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा सहज लाभ
- पिकानुसार किसान क्रेडिट कर्ज
- हवामान आणि आपत्ती सल्ला
- बाजारभाव, कीड व रोगांबाबत मार्गदर्शन
- कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला
- मृदा आरोग्य माहिती
- शेतमाल विक्रीसाठी ऑनलाईन मार्केटिंगची सुविधा
- अनुदान आणि कर्ज प्रक्रियेस सुलभता
फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- शेतजमिनीच्या सात-बारा आणि आठ अ उताऱ्याची प्रत
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
- बँक खाते क्रमांक आणि पासबुक प्रत
शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवण्यासाठी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन अर्ज करता येईल. सरकारने तालुका स्तरावर सेवा केंद्र चालकांना याबाबत प्रशिक्षण दिले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
अधिक माहितीसाठी:
शेतकरी आपल्या गावातील कृषी अधिकारी किंवा तहसील कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. तसेच, अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत जाणून घेऊ शकतात.