किसानवाणी | उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांशी तरूण-तरूणी नोकरीच्या मागे लागताना दिसतात. परंतु ज्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे, इतरांसाठी रोजगार निर्माण करायचा आहे, ते मात्र व्यवसायाकडे (Small Business Idea) वळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐश्वर्या पाटील ही तरूणी यापैकीच एक. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर तिनं देखील नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. या व्यवसायातून तिला दिवसाला ५ ते ७ हजारांची कमाई होतेय. सहाजिकच ऐश्वर्याची महिन्याची कमाई दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. आज आपण तिचीच यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत… (वरील व्हीडीओवर क्लिक करून संपूर्ण यशोगाथा पहा)