किसानवाणी | ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ऊस पिकावर हुमनी किडीचा प्रादुर्भाव खूपच वाढल्याचे दिसत आहे. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाचे जवळपास 30 ते 80 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ऊस हे कायमस्वरूपी पाण्याची आवश्यकता असणारे पीक आहे. त्यामुळे ऊस पिकात हुमणी किडीस पोषक असणारा ओलावा आणि अन्न पुरवठा कायमस्वरूपी उपलब्ध असतो. परिणामी हुमणीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतानाच दिसून येतो. म्हणूनच हुमणी किडीचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिचे प्रभावीपणे नियंत्रण कसे करावे हे आपण जाणून घेऊया.. (Metarhizium fungi for humani control)