योजना

ऊसतोड कामगारांसाठी शासनाची विमा योजना, जाणून घ्या सविस्तर | Sugarcane Workers Accident Insurance Scheme

किसानवाणी | साखर कारखानदारीमध्ये ऊसतोड कामगार (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) हा महत्त्वाचा घटक मानला जातो. ऊसतोड करत असताना उसतोड कामगारांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती बरोबरच इतरही अपघाताच्या घटना घडत असतात. मात्र अशा घटना घडल्यास अपघाती विमा नसल्याने उसतोड कामगारांना नुकसानीस सामोरे जावे लागते. ऊसतोड कामगारांच्या बाबतीतील हीच समस्या दुर करण्यासाठी राज्य शासनाने पावलं उचलली आहेत.

ऊसतोड कामगारांना मिळणार विमा कवच (Sugarcane Workers Accident Insurance Scheme)

स्व. गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना’ नुकतीच लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादमांना झोपडी, बैल जोडी यासाठी विमा संरक्षण मिळणार आहे. साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति मेट्रीक टन १० रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या योजनेसाठी खर्च करण्यात येणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम, सुमारे दीड ते दोन लाख पशुधना आणि मजुरांच्या झोपडीलाही विम्याचे संरक्षण मिळणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) स्थापना करून त्याअंतर्गत यासंदर्भातील योजना प्रस्तावित केली होती.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) कवच या निर्णयानुसार लागू करण्यात येत आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च ‘स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा’च्या भांडवलातून करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, मुकादम, कारखाना यांपैकी कुणावरही कसलाही आर्थिक भार राहणार नाही.

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित

बीडसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील 10 लाख ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शेजारील राज्यात कमीत कमी 6 महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र अत्यंत मेहनत व जोखमीचे काम त्यांना करावे लागते.

ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा शॉक, सर्पदंश, वारा-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना ऊसतोड कामगारांचे अनेकदा जीव जातात. अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात व त्यांच्या कुटुंबाचा आधार नाहीसा होतो. त्यामुळे या ऊसतोड कामगारांना, वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या पशूंना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी व दुर्दैवाने मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा निरनिराळ्या तरतुदी असाव्यात यासाठी ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

Back to top button