कृषि स्वावलंबन योजना काय आहे? योजनेचा लाभ कुणाला मिळतो? जाणून घ्या | Krushi Swavalamban Yojana 

जिल्हा परिषद, कोल्हापूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२-२०२३

(अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे)
नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इलेक्ट्रीक मोटार, ठिबक सिंचन, तुषार सिंचन

अनुसूचत जाती, नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी यापूर्वी राबवण्यात येत असलेली अनु. जाती उपयोजना (विशेष घटक योजना) सुधारित करून, सदर योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने ५ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये सन २०१६-१७ पासून राबवणेत येत आहे.

सदर योजनेमध्ये सन २०२२-२३ या वर्षात खालील घटकांसाठी पुढे नमूद रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील.
 • नवीन विहिर बांधण्यासाठी – रु. २,५०,००० (अडीच लाख )
 • जुनी विहीर दुरुस्ती – रु. ५०,००० (पन्नास हजार)
 • इनवेल बोअरींग – रु. २०,००० (वीस हजार )
 • पंप संच – रु. २०,००० (वीस हजार – १० अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे विद्युत पंपसंच करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार १०० टक्के अनुदान देय राहील)
 • वीज जोडणी आकार – रु. १०,००० (दहा हजार)
 • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण – रु. १,००,००० (एक लाख)
 • सुक्ष्म सिंचन संच
  • ठिबक सिंचन ५०,०००(पन्नास हजार)
  • तुषार सिंचन २५,००० (पंचवीस हजार)

सदर योजनेअंतर्गत वरील ७ बाबी असून लाभ हा पॅकेज स्वरूपात द्यावयचा आहे. खालील तीन पॅकेज मधील एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थ्यास अनुदेय राहील.

पॅकेज १. नवीन विहीर –
नवीन विहीर, पंपसंच, वीजजोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व आवश्यकते नुसार इनवेल बोअरिंग
पॅकेज २. जुनी विहीर दुरूस्ती –
जुनी विहीर दुरूस्ती, पंपसंच, वीजजोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व आवश्यकते नुसार इनवेल बोअरिंग
पॅकेज ३. शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज –
शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीजजोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग

ज्या अनुसुचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांने ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण केले आहे त्याच शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ घेता येईल.

ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना पंपसंच, वीजजोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देय राहील.

सोलर पंपासाठी अनुदान – जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीज जोडणीसाठी अनुदन अनुदानाच्या मर्यादेत (रू.३०,०००) लाभार्थी हिश्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.

वरील घटकांपैकी लाभार्थ्यांकडे काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खालील आवश्यक घटकांची निवड करता येईल.
१) पंपसंच २) वीज जोडणी आकार ३) सूक्ष्म सिंचन (ठिबक/तुषार)

लाभार्थी पात्रतेच्या अटी

 1. लाभार्थी अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतकरी प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
 2. लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 3. जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
 4. लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक
 5. उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 6. लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
 7. आधार कार्ड, बॅंक पासबुक

मा.श्री. भिमाशंकर पाटील – कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर.
मा. श्री. संजयसिंह चव्हाण, भा.प्र.से. – मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद कोल्हापूर.
मा. श्री. अजयकुमार माने – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद कोल्हापूर.

किसानवाणी अपडेट

संबंधित अपडेट