बाजारात आला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; पेट्रोल-डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत काय होणार फायदे? | Electric Tractor for farming
आता लवकरच शेतकर्यांना शेतात परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) मिळतील. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त शेतकर्यांसाठी यामुळे दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) बाजारात उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकर्यांचा खर्च निश्चितच कमी होईल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल.
सध्या बाजारात उपलब्ध असलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) थोडे महाग आहेत, परंतु गेल्या काही दिवसांपासून इतर कंपन्याही बाजारात प्रवेश केल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे वाढत्या स्पर्धेमुळे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे फायदे (Electric Tractor)
- डिझेल-पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च
- प्रदूषणमुक्त (Pollution Free)
- कमी आवाज
- मेंटेनन्स कमी (Low Maintenance)
- शासनाकडून सबसिडी (Government Subsidy)ची शक्यता
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) अद्याप शेतात नांगरणीसाठी पूर्णपणे सक्षम नाहीत, तरीही ते वाहतूक (Transportation) जसे पिके बाजारात नेण्यासाठी आणि इतर शेतीकामांसाठी (Agriculture Work) उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यात सुधारणा घडवून आणल्या जात आहेत. त्यामुळे लवकरच सर्व शेती कामांसाठी उपयुक्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या नव तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होऊन शेतकर्यांच्या जीवनात सुधारणा होईल असे सांगितले जात आहे.