योजनाशेती तंत्रज्ञान

शेती कामासाठी उपयुक्त टॉप 10 रोटाव्हेटर (ट्रॅक्टर चलित) कोणते? जाणून घ्या.. Top 10 Rotavator for Farming

खरीप हंगाम जवळ येत आहे आणि शेतकऱ्यांना शेतीची पेरणीपूर्व मशागत लवकरच सुरू करावी लागणार आहे. यासाठी अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसाठी आधुनिक रोटाव्हेटर खरेदी करण्याचा विचार करत असतील. रोटाव्हेटर हे ट्रॅक्टरला जोडून चालवले जाणारे कृषी यंत्र आहे जे शेतीची जमीन तयार करण्यासाठी वापरले जाते. हे माती मुरुड करून, समतल करून आणि हवा-पाणी व्यवस्थापन सुधारून जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करते.

जर तुम्हीही रोटाव्हेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी काही उपयुक्त माहिती आम्ही याठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.

देशातील टॉप 10 रोटावेटर (Top 10 Rotavator For Farmers)

1. मॅसिओ गॅस्पर्डो रोटावेटर : मॅसिओ गॅस्पर्डो कंपनीचे सुमारे 48 प्रकारचे रोटाव्हेटर्स (Top 10 Rotavator) प्रचलित आहेत. या कंपनीकडे Virat Pro, Virat J 175, Virat Pro HC 185, Virat Pro 125, Virat Regular 185, Virat Plus 145 इत्यादी मॉडेल्स आहेत.

2. शक्तिमान रोटावेटर : शक्तीमान कंपनीचे 18 प्रकारचे रोटाव्हेटर्स प्रचलित आहेत. रेग्युलर लाइट, चॅम्पियन सीरीज, यू-सिरीज, सेमी चॅम्पियन प्लस, रेग्युलर सीझन एसआरटी इत्यादी मॉडेल्स आहेत.

3. सोनालिका रोटावेटर : सोनालिका रोटावेटरचे 7 मॉडेल्स प्रचलित आहेत. यामध्ये मिनी स्मार्ट सिरीज चेन ड्राइव्ह, चॅलेंजर सिरीज, मिनी स्मार्ट सिरीज गियर ड्राइव्ह, स्मार्ट सिरीज, हॉर्नगल स्पीड सिरीज इत्यादी मॉडेल्स आहेत.

4. महिंद्रा रोटावेटर : महिंद्रा रोटावेटरची 17 मॉडेल्स प्रचलित आहेत. Gyrovator ZLX Plus, Gyrovator RLX, Gyrovator ZLX, Gyrovator SLX 175 इत्यादी मॉडेल्स आहेत.

5. फिल्डकिंग रोटावेटर : फील्डकिंगचे एकूण 12 मॉडेल प्रचलित आहेत. गोल्ड रोटरी टिलर, रेग्युलर मल्टी स्पीड, सिंगल मल्टी स्पीड, रुबस्ट सिंगल स्पीड इत्यादी मॉडेल्स आहेत.

6. सॉईल मास्तरचे रोटावेटर : सॉइल मास्टरचे 8 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये JSMRT-C6 (6 फूट), JSMRT C7 (7 फूट), JSMRT L7 (7 फूट), JSMRT C5 (5 फूट) मॉडेल्सचा समावेश आहे.

7. खेडुत रोटावेटर : हेवी ड्युटी रोटरी टिलर, रोटरी टिलर रेग्युलर गायरोव्हेटर, मिनी रोटरी टिलर, रोटरी टिलर KAE RD मॉडेल्स अशी खेडूतची 4 मॉडेल्स चलनात आहेत.

8. करतार रोटावेटर : करतारचे 5 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये जंबो 636-48, जंबो 536–42, रोटाव्हेटर
736-54, केआर 763-48, केआर 636-42 मॉडेल्सचा समावेश आहे.

9. दशमेश रोटावेटर : दशमेशचे दोन मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये 642 रोटाव्हेटर/रोटरी टिलर, 642 (7 फूट) मॉडेल्सचा समावेश आहे.

10. लँडफोर्स रोटावेटर : लँडफोर्सचे 4 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये Robusto, Mini Series, Supremo, Vivo या मॉडेल्सचा समावेश आहे.

रोटाव्हेटर खरेदीसाठी सरकारी अनुदान मिळते का?

रोटाव्हेटर खरेदीवर सरकारकडून राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळते. या योजनांमधून शेतकऱ्यांना रोटाव्हेटर खरेदीवर 40 ते 50% पर्यंत अनुदान मिळू शकते.अधिक माहितीसाठी आपण आपल्या जिल्ह्यातील कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.

या योजनेतून खाली दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
१) ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे

अनुदान मिळण्यासाठी पात्रता:

  • अनुदानासाठी अर्ज करणारा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांकडे जमीन असल्याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे.
  • जमिनीची मालकी हक्क असल्याचा दाखला (उदा. ७/१२) दाखवावा लागेल.
  • आधार कार्ड आणि बँक खाते यांची प्रत द्यावी लागेल.
  • जातीचा दाखला (एससी/एसटी/ओबीसी साठी)

Back to top button