बातम्या

अर्थसंकल्प 2024 मधून शेतकऱ्यांच्या पदरात काय? जाणून घ्या.. | Agriculture Budget 2024

किसानवाणी | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी आज मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होणार? या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला (Agriculture Budget 2024) नेमकं काय मिळणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष होतं. चला तर जाणून घेऊया या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळालं यासंदर्भात… 

Agriculture Budget 2024 : दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार

या अर्थसंकल्पात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. तसेच तेलबियांमध्ये स्वावलंबी होण्यासाठी धोरण आखले जाणार आहे. वेगवान विकासासाठी नवीन आर्थिक धोरणे आखली जात आहेत. ३८ लाख शेतकऱ्यांना पीएम संपदा योजनेचा लाभ झाला आहे. पीएम मत्स्य योजना ५५ लाख नवीन नोकऱ्या देणार असल्याचीही घोषणा त्यांनी या बजेटमध्ये केली आहे. तसेच PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

Agriculture Budget 2024 : शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणा

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपीचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे सांगितले. दुग्ध उत्पादकांच्या मदतीसाठी योजना आखण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा फायदा झाला आहे. तर 80 कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आलं आहे. 390 कृषी विद्यापीठं सरकारनं सुरु केली आहेत. तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सरकार 5 इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क्स उघडणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 

Back to top button