बातम्या

वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करता येते का? ‘हा’ अधिकार वडिलांना आहे का? जाणून घ्या सविस्तर | Ancestral Land

वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय? (What is ancestral land?)

वडिलोपार्जित जमीन (Ancestral Land) म्हणजे काय तर आपल्या मागील तीन पिढ्यांपासून आपल्या कुटुंबाला मिळालेली जमीन म्हणजे वडिलोपार्जित जमीन होय. तुमच्या वडिलांनी स्वकमाईने खरेदी केलेली जमीन ही वडिलोपार्जित नसते. अशा जमिनीबाबत सर्वस्वी त्यांना अधिकार असतो. मात्र वडिलोपार्जित जमिनीवर कुटुंबातील सर्व सदस्यांचा अधिकार असतो. याच वडिलोपार्जित जमिनीवर आज गावागावात वाद विकोपाला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कायदेशीररित्या वडिलोपार्जित जमिनीच्या हक्काबाबत माहिती असणे आवश्यक बनले आहे.

वडिलोपार्जित जमिनीवर नातवाचा किती अधिकार असतो? (How much right does a grandchild have on ancestral land?)

नातू हा जन्माला येताच त्याचा वडिलोपार्जित जमिनीवर हक्क निर्माण झालेला असतो. त्यामुळे नातवाला आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर त्याच क्षणी पूर्ण अधिकार प्राप्त झालेला असतो. मग त्याचे वडील जिवंत असोत किंवा नसो. नातवाला वडिलोपार्जित संपत्तीचा अधिकार मिळण्यासाठी वडील किंवा आजोबा यांच्या मृत्यूचा संबंध नसतो. कधी-कधी आजोबांना दोन मुले असतील आणि वडिलांचा मृत्यू झालेला असेल. तर अशावेळी चुलत्याकडून पुतण्याची (म्हणजेच नातवाची) फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या अधिकाराबाबत नातवाला माहिती असणे आवश्यक आहे.

वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करता येते का? (Can one be evicted from ancestral land?)

वडिलोपार्जित जमिनीवर (Ancestral Land) सर्व नातवांना अधिकार मिळालेला असतो. तुमचे वडील पंजोबांचे नातू असतात. तर तुम्ही तुमच्या आजोबांचे नातू असतात. त्यामुळे जमीन ही तीन पिढ्यांची असेल तर अशा जमिनीचे वारसदार हे कुटुंबातील सर्व नातू असतात. अशावेळी तुमचे वडील तुमचा वडिलोपार्जित जमिनीवरील हक्क कोणत्याही परिस्थितीत नाकारू शकत नाही. वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करण्याचा अधिकार वडिलांना कायद्याने नसतो. वडिलोपार्जित जमिनीवरील हक्कापासून कोणत्याही परिस्थितीत नातवाला वंचित ठेवले जाऊ शकत नाही.

आई-वडील आपल्या मुलांना त्यांच्या कमावलेल्या मालमत्तेतूनच बाहेर काढू शकतात. मात्र, काही प्रकरणे अशी ही समोर आली आहेत की, न्यायालयाने वडिलोपार्जित मालमत्तेतूनही मुलाला बाहेर काढण्यास परवानगी दिली आहे.

वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

आपण वडिलोपार्जित मालमत्तेवर किती वर्षे दावा करू शकता. कायद्यानुसार हे काम फक्त १२ वर्षांसाठी करता येते. जर एखाद्याला असे वाटत असेल की एखाद्या मालमत्तेत आपला वडिलोपार्जित हक्क आहे आणि त्याला चुकीच्या पद्धतीने इच्छापत्रातून वगळण्यात आले आहे. तर तो न्यायालयात जाऊन 12 वर्षांच्या आत न्याय मागू शकतो. तसे न केल्यास त्याचा वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क गमावला जातो. यानंतर जर त्या व्यक्तीकडे वैध कारण असेल तर न्यायालय त्याचे म्हणणे ऐकून घेईल किंवा मालमत्ता त्याच्या हातातून निघून जाईल.

Back to top button