यशोगाथाशेती तंत्रज्ञान
सहकारी तत्वावरील काजू प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५ कोटींची उलाढाल; पहा ही यशोगाथा | Cashew Nut Processing Business
किसानवाणी | सहकाराची पाळमुळं पश्चिम महाराष्ट्रात खोलवर रूजलीत, पण हा सहकार कोकणात रूजवला आणि कोकणातील मेव्यावर प्रक्रिया केली, तर कोकणातील ग्रामीण अर्थकारण बदलू शकतं. मुंबईतील सहकारी बॅंकेत नोकरी केलेल्या विचारे यांनी हाच विचार करून, निवृत्तीनंतर रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची उभारणी केलीय. आज ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांच्या काजूवर प्रक्रिया (Cashew Nut Processing Business) करून त्यांना चांगला दर मिळवून देताहेत. चला तर आज आपण कोकणातील ‘या’ सहकारी तत्वावर चालणाऱ्या प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊया…