शेतकऱ्यांना 3 महिन्यात लखपती करणारी ‘चिया शेती’; जाणून घ्या सविस्तर | Chia farming

चिया ही एक औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव साल्विया हिस्पॅनिका आहे. चिया पिकाला (Chia farming) सुपर फूड मानले जाते. हे प्रामुख्याने फुलांचे रोप आहे. चिया हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. गेल्या काही वर्षापासून चिया पिकाची लागवड भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यासह इतर काही भागांत शेतकरी त्याची लागवड करतात. हळूहळू त्याचा विस्तार इतर राज्यांतही होत असून, महाराष्ट्रातील शेतकरी देखील चिया शेतीकडे वळू लागले आहेत.

चिया बियांमध्ये प्रथिने, फायबर, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि पोटॅशियम यासारख्या पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त असते. यामुळे चिया बियाणे हे एक पौष्टिक आहाराचे स्त्रोत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे बाजारात याची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

चिया शेती ही एक फायदेशीर शेती आहे. चिया पिकाला पाण्याची आवश्यकता कमी असते. तसेच, चिया पिकाला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. चियाचे पीक 110 ते 115 दिवसांत तयार होते. चिया बियाणे लागवडीसाठी सिंचनाची विशेष गरज नसते. पाण्याचा चांगला निचरा असलेली जमीन चिया बियाण्यांच्या लागवडीसाठी अधिक चांगली मानली जाते. तसेच चिया लागवडीतून 3 ते 4 महिन्यात एक एकरात सरासरी 5 ते 6 प्रति क्विंटल उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांना या पिकासाठी बियाणे आणि औषधी देऊन कंपन्या उत्पादित चिया बियाणे 16 हजार रुपये प्रति क्चिटल दराने खरेदी करत आहेत.

चिया शेतीची काळजी :
चिया पिकाला पाण्याची आवश्यकता कमी असते. त्यामुळे, चिया पिकाला आठवड्यातून एकदा पाणी दिले जाते. चिया पिकाला खते देण्याची आवश्यकता नसते. तथापि, जर खते दिली तर चिया पिकाचे उत्पादन वाढू शकते. चिया पिकाला कोणत्याही कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे, चिया पिकाला फवारणी करण्याची आवश्यकता नसते.

वन्यप्राण्यांचा धोका नाही :
चिया बियाणे वनस्पतीस एक विशेष वास असतो. याच्या पानांवर बारीक केसाळ लव वाढते. त्यामुळे वन्यप्राणी त्यापासून दूर राहतात आणि पिकाला हानी पोहोचवत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. हे पीक उपटून काढले जाते. यानंतर वाळवून मळणी केली जाते. शिवाय चिया बियाणे विकायला बाजारात जाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगतात. लागण केल्यानंतर याची माहिती शेतकऱ्यांनी कंपन्यांना दिली तर त्यांचे एजंट शेतातूनच याची खरेदी करतात.

चिया शेतीचे फायदे

  • चिया शेती ही एक फायदेशीर शेती आहे.
  • चिया पिकाला पाण्याची आवश्यकता कमी असते.
  • चिया पिकाला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो.
  • चिया पिकाला 60 ते 80 दिवसांत काढणी केली जाते.
  • चिया बियाण्यांच्या बाजारात चांगला भाव मिळतो.
पतीच्या निधनानंतरही ऊस रोपवाटिकेच्या व्यवसायात यशाची उंची गाठणाऱ्या सारिका लठ्ठे, वाचा त्यांची प्रेरणादायी कहाणी | Women Agriculture Success Story भारताचे पहिले व्हरज्यूस स्टार्टअप – रिद्धी राणेची यशोगाथा!
पतीच्या निधनानंतरही ऊस रोपवाटिकेच्या व्यवसायात यशाची उंची गाठणाऱ्या सारिका लठ्ठे, वाचा त्यांची प्रेरणादायी कहाणी | Women Agriculture Success Story