योजना

शेतकरी बंधूनो, धान्याची साठवणूक करण्यासाठी शासन देतयं अनुदान.. असा घ्या लाभ | Government Scheme for Farmers

किसानवाणी | शेतकऱ्यांना शेतात पिकविलेले कडधान्य आणि तृणधान्य साठविण्यासाठी देखील सरकारी अनुदान दिले जाते. याचा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या योजनेतून प्रत्येक शेतकरी सुमारे ५०० किलो कडधान्य किंवा तृणधान्य साठवून ठेऊ शकतात.

Government Scheme for Farmers

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान :
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) व पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत घरगुती साठवणुकीची कोठी (प्रती शेतकरी 5 क्विंटल क्षमता मर्यादेत) या घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (अर्जामधील अटींची पुर्ततेसह) तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे. (ही योजना प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असते, शेतकऱ्यांनी या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा)

अनुदान कुणाला मिळणार 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भुधारक इतर शेतकरी पात्र असतील. 5 क्विंटल साठवणूक क्षमतेच्या कोठीसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा रूपये 2 हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान दर लागु असेल. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पध्दतीचा अवलंब केला जाईल. या घटकाची खरेदी झाल्यानंतर शेतकरी, शेतकरी प्रतिनिधी समवेत अक्षांश व रेखांशासह फोटो घेतल्यानंतर तपासणी करुन लाभार्थ्यांना डी.बी.टी. पध्दतीने त्यांच्या बँक खातेवर अनुदान देण्यात येईल. 

योजनेच्या अधिक माहितीसाठी
शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी किंवा कृषी सहायकाशी संपर्क साधून या योजनेची माहिती घेऊन सहभागी व्हावे.

Back to top button