योजना

शेतकऱ्यांना आता मिळणार २ हजार ऐवजी ४ हजार रूपये | वर्षाला १२ हजार | Shetkari Sanman Nidhi

मुंबई | शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी (Shetkari Sanman Nidhi) योजनेची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.

या योजनेंतर्गत राज्य सरकार ६ हजार रुपये प्रति वर्षी देणार आहे. त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजेनंतर्गत भर घालण्याच्या उद्देशाने यात राज्य सरकारची भर पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ १.१५ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरावी लागणार नाही. त्याऐवजी राज्य सरकार तो हिस्सा भरणार आहे. शेतकऱ्यांना एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येईल. त्यासाठी ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.

पाच ध्येयावर आधारित अर्थसंकल्प

पंच अमृत

१) शाश्वती शेती-समृद्ध शेतकरी
२) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व समाज घटकांचा विाकस
३) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४)रोजगार निर्मिती-सक्षम, कुशल रोजगार युवा
५) पर्यावरणपूरक विकास

– राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
– पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
– तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
– एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
– 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार.
– आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून
– आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
– शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
– 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

Back to top button