बातम्यायोजनाशेती तंत्रज्ञान

Mini Tractor Subsidy 2024 : बचत गटांनी अनुदानावरील मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करावेत

किसानवाणी | राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने २०२३-२४ अनुसूचित जाती व नवबौद्व घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्‍वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असून, जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसाह्यता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Mini Tractor Subsidy 2024

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचा नोंदणीकृत बचत गट असावा. बचत गटाचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असावे. गटामध्ये किमान १० सदस्य असावेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचेच असावेत. बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.

स्वयंसाह्यता बचत गटाने राष्ट्रीयीकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व बँक खाते बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बचत गटाने व गटातील सदस्यांनी या पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये इतकी राहील.

कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या १० टक्के (३५ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट) स्व-हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या १० टक्के (कमाल ३ लाख १५ हजार रुपये) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. अर्जाची संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त आलेली असल्यास पात्र अर्जदारांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. बचत गटातील किमान एका सदस्याकडे वाहन चालविण्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा परवाना असावा. अथवा प्रशिक्षण घेत असलेले प्रमाणपत्र असावे. अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचत गटानी तसेच या पूर्वी अर्ज सादर केले आहे. अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांमधून विनामूल्य उपलब्ध असून, अर्ज बचत गटाच्या नावे देण्यात येईल.

एका बचत गटास एकच अर्ज मिळणार असून, त्यासंबंधीची बचत गटाने कागदपत्रे सादर करावीत. परिपूर्ण भरलेले अर्ज आणि आवश्यक असलेली कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह अर्ज ता. २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button