बातम्या

रासायनिक खतांच्या किंमती वाढणार? ‘हे’ कारण आले समोर | Fertilizers Rate

किसानवाणी | डीएपीसारखी खते भारताला सवलतीच्या दरात बंद झाल्याने खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी भारताला मोठ्या प्रमाणात डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत रशियन कंपन्यांकडून येत होते. परंतु यंदा रशियन कंपन्यांनी बाजारभावाप्रमाणे खते देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन कंपन्यांनी सवलीच्या दरातील खते देणे बंद केल्याने यामुळे भारतातील शेतकरी संकटात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पावसाने दडी मारल्याने पिकांना फटका बसत आहे, अशातच खतांच्या किंमती वाढल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहे.

जागतिक स्तरावर खतांचा पुरवठा करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने रशियन कंपन्यांकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे बाजारपेठेतील किमतीप्रमाणे खतांचा पुरवठा करण्याची भूमिका रशियन कंपन्यांनी घेतली. रशियन कंपन्यांच्या या निर्णयामुळे भारतात खतांच्या किमती तसेच खतांवरील अनुदानात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील वाढत्या किमतीमुळे चीननेही खतांची निर्यात कमी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

खतनिर्मिती करणाऱ्या एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात रशियन खत निर्मीती कंपन्यांकडून सवलतीच्या दरात खते मिळणे अशक्य आहे. 2022-23 या वित्तीय वर्षात भारताने रशियाकडून 4.35 टन खते आयात केली होती. आयातीचे हे प्रमाण 246 टक्के वाढले होते. रशियाने गेल्यावर्षी आपल्या खतांची मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे खतांच्या निर्यातीमध्ये चीन, इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती या देशांचा वाटा कमी झाला होता.

रशियन कंपन्या प्रति टनाला 6631.64 इतकी सवलत देत होत्या. आता ते टनाला 425 रुपयेही द्यायला तयार होत नसल्याती माहिती एका भारतीय कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली. रशियन डीएपीची सध्याची किंमत भारतीय खरेदीदारांसाठी किंमत आणि मालवाहतूक (CFR) आधारावर प्रति टन अंदाजे 47 हजार 261 इतकी आहे. यामध्ये भारताला विशेष सवलत मिळत होती. आता रशियन कंपन्यांनी सवलत देण्यास नकार दिला आहे.

Back to top button