किसानवाणी | नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातील १० शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (प्रति थेंब अधिक पीक) विशेष पाहुणे म्हणून निवडण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या व प्रभावीपणे काम केलेल्या शेतकऱ्यांची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यातील १० शेतकऱ्यांना (सपत्नीक) उपस्थितीचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे शेतकरी २४ ते २६ जानेवारी या काळात सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
निवडलेले शेतकरी
- अमोल भास्करराव पुंडकर (येऊलखेड, ता. शेगाव, जि. बुलडाणा),
- दिलीप काळे (मोहाडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा)
- अशोक जाधव (काथापूर, ता. आंबेगाव, जि. पुणे),
- दीपक गुरगुडे (बाभूळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे),
- चंद्रकांत सोळुंके (चिमनापूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर),
- काकासाहेब चाथे (चाथा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर),
- बापूराव श्रावण बडगुजर (पाचोरा, जि. जळगाव),
- अमोल गणेश पाटील (केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव),
- बापू गजेंद्र नहाने (देवधानोरा, ता. कळंब, जि. धाराशिव),
- श्रीकांत गोविंदराव भिसे (एकुरका, ता. कळंब, जि. धाराशिव)