बाजारभाव

तुरीची 11 हजाराकडे वाटचाल! पहा आजचे राज्यातील बाजारभाव! Tur Bajarbhav 2024

किसानवाणी | राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात (Tur Bajarbhav 2024) वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे. आज जालना बाजार समितीत तूर दराने 11 हजार पर्यंत मजली मारली. येथे आज पांढऱ्या तुरीला कमाल 10799 रुपये तर लाल तुरीला कमाल 10412 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. महिनाभरापूर्वी 8000 ते 9000 रुपये प्रति क्विंटल विकल्या जाणाऱ्या तुर दराचा (Tur Bajar Bhav 2024) चढता आलेख सुरु झाल्याने, उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

Tur Bajarbhav 2024 : राज्यातील बाजार समित्यांमध्ये झालेली तुरीची आवक आणि मिळालेला दर

  1. जालना बाजार समितीत आज पांढऱ्या तुरीची (Tur Bajar Bhav) 2197 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10799 ते किमान 8000 रुपये तर सरासरी 10100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  2. अकोला बाजार समितीत आज तुरीची 2062 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10310 ते किमान 8000 रुपये तर सरासरी 9600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  3. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज तुरीची 157 क्विंटल आवक झाली, कमाल दर 10338 ते किमान 8600 रुपये आणि सरासरी दर 9900 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
  4. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बाजार समितीत आज तुरीची 66 क्विंटल आवक झाली, कमाल 10252 ते किमान 8000 रुपये दर मिळाला.
  5. नागपूर बाजार समितीत आज तुरीची 3304 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10211 ते किमान 8500 रुपये दर मिळाला. सरासरी दर 9783 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
  6. सोलापूर जिल्ह्यातील दुधणी बाजार समितीत आज तुरीची 506 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10150 ते किमान 8800 रुपये तर सरासरी 9500 रुपये प्रति क्विंटल, करमाळा बाजार समितीत आज तुरीची 137 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10211 ते किमान 9600 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

याशिवाय लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, चाकूर, जळकोट, औराद शहाजानी; बीड जिल्ह्यातील आंबेजोबाई, गेवराई; जळगाव, अमरावती, हिंगोली, वाशीम जिल्ह्यातील कारंजा, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा या बाजार समित्यांमध्ये तूर दराने 10 हजारी घोडदौड कायम ठेवली आहे. तर राज्यातील उर्वरित बाजारसमित्यांमध्ये तूर 10 हजारांच्या आसपास टिकून आहे.

दरम्यान, 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हमीभावाने तूर खरेदीसाठी पोर्टल सुरु केले आहे. ही बाब समोर येताच व्यापाऱ्यांकडून अचानक मागणी वाढल्याने दरात वाढ पाहायला मिळत आहे. तूर दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून हे दर 11 ते 12 हजारांच्या आसपास जाऊ शकतात, असा अंदाज कृषी बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

Back to top button