किसानवाणी | सध्या ChatGPT नावाचं AI तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होताना दिसतय.. जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानानं जोडण्याचं काम सुरू आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांच्या समस्याही दूर करण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच किसान GPT नावाचा AI चॅटबॉट सुरू करण्यात आलाय. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा Kissan GPT चॅटबॉट गेम चेंजर ठरू शकतो, असं कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. हा चॅटबॉट नेमकं कसं काम करतो आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तर कशी देतो हे जाणून घेणं गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या ॲपबद्दल खालील व्हीडीओच्या माध्यमातून..
शेती तंत्रज्ञान
Kisanwani
सहकारी तत्वावरील काजू प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५ कोटींची उलाढाल; पहा ही यशोगाथा | Cashew Nut Processing Business
किसानवाणी | सहकाराची पाळमुळं पश्चिम महाराष्ट्रात खोलवर रूजलीत, पण हा सहकार कोकणात रूजवला आणि कोकणातील मेव्यावर प्रक्रिया केली, तर कोकणातील ग्रामीण अर्थकारण बदलू शकतं. मुंबईतील सहकारी बॅंकेत नोकरी केलेल्या विचारे यांनी हाच विचार करून, निवृत्तीनंतर रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची उभारणी केलीय. आज ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांच्या काजूवर प्रक्रिया (Cashew Nut Processing Business) करून त्यांना चांगला दर मिळवून देताहेत. चला तर आज आपण कोकणातील ‘या’ सहकारी तत्वावर चालणाऱ्या प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊया…
कामगंध सापळे.. प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन? जाणून घ्या सविस्तर | How to use Pheromone Traps
किसानवाणी | पिकांच्या एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर सर्वात प्रभावी आणि कमीत कमी खर्चाचा ठरतो. यामुळे किडींचे नियंत्रण तर होतेच शिवाय किडींमुळे होणारे नुकसान टळल्याने पिक उत्पादनातही वाढ होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करण्याआधी ही पध्दत नेमकी कशी काम करते हे समजून घेणे फार गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया.. (How to use Pheromone Traps)