किसानवाणी | सध्या ChatGPT नावाचं AI तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होताना दिसतय.. जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानानं जोडण्याचं काम सुरू आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांच्या समस्याही दूर करण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच किसान GPT नावाचा AI चॅटबॉट सुरू करण्यात आलाय. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा Kissan GPT चॅटबॉट गेम चेंजर ठरू शकतो, असं कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. हा चॅटबॉट नेमकं कसं काम करतो आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तर कशी देतो हे जाणून घेणं गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या ॲपबद्दल खालील व्हीडीओच्या माध्यमातून..
आता शेत जमीनीची मोजणी होणारं काही क्षणात, ‘या’ तंत्राने होणार मोजणी, जाणून घ्या सविस्तर | Land Survey
मुंबई | शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे छळणारी जमीन मोजणीची (Land Survey) पद्धत आणि कागदी नकाशे आता कायमचे हद्दपार होणार आहेत. भूमी अभिलेख (Land Record) संचालनालयाने आता ‘जीपीएस’च्या मदतीने ‘ई-मोजणी प्रकल्प’ (E-Land Survey) आता राज्यभर राबविला जाणार आहे. त्यामुळे मोजणीसाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख खात्यात खेटे मारावे लागणार नाहीत. तसेच जमीन मोजणीचे डिजिटल नकाशे थेट भ्रमणध्वनीवर उपलब्ध होणार आहेत. … Read more