शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 90 टक्क्यापर्यंत अनुदान देणाऱ्या योजना, जाणून घ्या सविस्तर | Tractor Subsidy Scheme

किसानवाणी | भारत हा कृषीप्रधान देश असून देशातील सुमारे 60% लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून भारतीय शेतकऱ्यांना वेळोवेळी अनुदान दिले जाते. शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, बियाणे अनुदान, खत अनुदान, कृषी उपकरण अनुदान, सौरऊर्जा अनुदान, सिंचन उपकरण अनुदान, रोख अनुदान, वीज अनुदान, साखर खरेदी अनुदान, ऊस पेमेंट सबसिडी आदी अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांची आर्थिक … Read more

नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान; लगेच पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया

किसानवाणी | नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे ५० हजार रुपये देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजने अंतर्गत ३३ हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्तालयाकडून … Read more

कुक्कुटपालन व्यवसायासाठी 10 लाखापर्यंत अनुदान; येथे करा ऑनलाइन अर्ज | Poultry Farm Subsidy 2024

ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म (Poultry Farm Subsidy 2024) उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्के अनुदान देते. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ कसा मिळवायचा, यासाठी यासाठी कोण पात्र आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे माहित नसते. आज आपण याबद्दलच जाणून घेऊया… Poultry Farm Subsidy 2024 केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू … Read more

Poultry Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

डॉ. मुकुंद कदम, डॉ. दर्शना भैसारे, डॉ.अर्चना कदम Poultry Farming : ग्रामीण भागात उपजीविकेमध्ये कुक्कुटपालन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. हवामानातील बदलाचे परिणाम कुक्कुटपालन क्षेत्रामध्येही दिसत आहेत. या बदलांमुळे अंडी, चिकन उत्पादनावर परिणाम होत आहे. कुक्कुटपालनात सर्वाधिक खर्च हा खाद्यावर होतो. हे खाद्य मका, सोयाबीनपासून तयार केले जाते. हवामानातील बदलामुळे अनेक ठिकाणी मका व सोयाबीन उत्पादनात … Read more

शेती कामासाठी उपयुक्त टॉप 10 रोटाव्हेटर (ट्रॅक्टर चलित) कोणते? जाणून घ्या.. Top 10 Rotavator for Farming

खरीप हंगाम जवळ येत आहे आणि शेतकऱ्यांना शेतीची पेरणीपूर्व मशागत लवकरच सुरू करावी लागणार आहे. यासाठी अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसाठी आधुनिक रोटाव्हेटर खरेदी करण्याचा विचार करत असतील. रोटाव्हेटर हे ट्रॅक्टरला जोडून चालवले जाणारे कृषी यंत्र आहे जे शेतीची जमीन तयार करण्यासाठी वापरले जाते. हे माती मुरुड करून, समतल करून आणि हवा-पाणी व्यवस्थापन सुधारून जमिनीची सुपीकता … Read more

कमी भांडवलात घरच्या घरी करा केळी चिप्स व्यवसाय, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Banana Wafers Small Scale Industry

डॉ. शहाजी कदम, डॉ. शिवम साळुंके Banana Wafers Small Scale Industry : जागतिक क्रमवारीत केळी उत्पादनात भारताचा क्रमांक पहिला असून, एकूण जागतिक उत्पादनाच्या २५ टक्के उत्पादन होते. राष्ट्रीय स्तरावर एकूण ५.२० दशलक्ष टनांसह महाराष्ट्राचा केळी उत्पादनात तमिळनाडू, गुजरातनंतर तिसरा क्रमांक लागतो. भारतात एकूण उत्पादित केळीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक वापर ताजे फळ म्हणून केला जातो. ४ ते … Read more

पूर्ण विचारांती करा बांबू शेती | Bamboo Farming

विजय बोराडे:बांबू लागवड वाढलेल्या परिसरात त्यावर आधारित उ‌द्योग नसल्यामुळे एकतर बांबूला विक्रीसाठी मोजकेच पर्याय आहेत, मागणीही कमीच असल्याने पर्यायाने अपेक्षित दर देखील मिळताना दिसत नाही बांबू लागवड ते बाजारपेठेपर्यंतची निरीक्षणे बांबू लागवड तंत्रज्ञान, जातीची निवड या बाबत फारसे संशोधन आपल्या देशात, राज्यात झालेले नाही. बांबू बेटाचे आयुष्य मोठे आहे, दरवर्षी नियमित उत्पन्न घ्यायचे असल्यास परिपक्व … Read more

बाजारात आला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; पेट्रोल-डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत काय होणार फायदे? | Electric Tractor for farming

आता लवकरच शेतकर्‍यांना शेतात परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) मिळतील. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त शेतकर्‍यांसाठी यामुळे दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) बाजारात उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च निश्चितच कमी होईल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric … Read more

तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव; दरातील तेजी टिकून | Tur Market 1st May 2024

मुंबई | देशातील बहुतांशी बाजारात तुरीच्या भावातील तेजी टिकून आहे. तुरीचा भाव सरासरी ११ हजारांच्या पुढे आहे. यामध्ये जूनपर्यंत काही प्रमाणात चढ-उतार राहू शकतात. त्यानंतर मात्र सणासुदीच्यामुळे दराला आणखी आधार मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सध्या तुरीची सरासरी भावपातळी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. कमाल … Read more

द. आशियात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान, महाराष्ट्राची स्थिती काय? जाणून घ्या! Rain Forecast 2024

पुणे | भारत आणि दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम’तर्फे (सॅस्कॉफ) हे पूर्वानुमान वर्तविण्यात आले आहे. दक्षिण आशियाच्या अति उत्तरेकडील भाग, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता सॅस्कॉफ ने वर्तवली आहे. २०२३ मधील मॉन्सूनच्या पावसाचा आढावा … Read more