किसानवाणी | सध्या ChatGPT नावाचं AI तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होताना दिसतय.. जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानानं जोडण्याचं काम सुरू आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांच्या समस्याही दूर करण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच किसान GPT नावाचा AI चॅटबॉट सुरू करण्यात आलाय. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा Kissan GPT चॅटबॉट गेम चेंजर ठरू शकतो, असं कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. हा चॅटबॉट नेमकं कसं काम करतो आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तर कशी देतो हे जाणून घेणं गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या ॲपबद्दल खालील व्हीडीओच्या माध्यमातून..
विदर्भासह राज्यात पावसाचा जोर वाढणार | IMD Weather 2023
किसानवाणी | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पोषक प्रणालींमुळे विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. 13) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD Weather) वर्तविला आहे. दक्षिणेकडे सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस जैसलमेर, शिवपूरी, रांची, दिघा ते … Read more