किसानवाणी | सध्या ChatGPT नावाचं AI तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होताना दिसतय.. जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानानं जोडण्याचं काम सुरू आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांच्या समस्याही दूर करण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच किसान GPT नावाचा AI चॅटबॉट सुरू करण्यात आलाय. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा Kissan GPT चॅटबॉट गेम चेंजर ठरू शकतो, असं कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. हा चॅटबॉट नेमकं कसं काम करतो आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तर कशी देतो हे जाणून घेणं गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या ॲपबद्दल खालील व्हीडीओच्या माध्यमातून..
रासायनिक खतांच्या किंमती वाढणार? ‘हे’ कारण आले समोर | Fertilizers Rate
किसानवाणी | डीएपीसारखी खते भारताला सवलतीच्या दरात बंद झाल्याने खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी भारताला मोठ्या प्रमाणात डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत रशियन कंपन्यांकडून येत होते. परंतु यंदा रशियन कंपन्यांनी बाजारभावाप्रमाणे खते देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन कंपन्यांनी सवलीच्या दरातील खते देणे बंद केल्याने यामुळे भारतातील शेतकरी संकटात येण्याची भिती व्यक्त केली जात … Read more