किसानवाणी | सध्या ChatGPT नावाचं AI तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होताना दिसतय.. जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानानं जोडण्याचं काम सुरू आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांच्या समस्याही दूर करण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच किसान GPT नावाचा AI चॅटबॉट सुरू करण्यात आलाय. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा Kissan GPT चॅटबॉट गेम चेंजर ठरू शकतो, असं कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. हा चॅटबॉट नेमकं कसं काम करतो आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तर कशी देतो हे जाणून घेणं गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या ॲपबद्दल खालील व्हीडीओच्या माध्यमातून..
बातम्या
Kisanwani
Farmer Long March : महाराष्ट्र सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य, शेतकरी मोर्चा स्थगित
किसानवाणी | किसान सभेचा लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान झाल्याने मार्च (Farmer Long March) स्थगित करत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली. शेतकऱ्यांनी 14 मागण्यांसाठी नाशिकपासून लाँन्ग मार्च काढला होता. मात्र, शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर धडकण्यापुर्वीच सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काहीअंशी तोडगा … Read more
शेतकरी लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा ह्रदयद्रावक मृत्यू; आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का?
मुंबई | शेतकरी लाँग मार्चच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्याना रूग्ण्लयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच … Read more
शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने | Farmers Long March
मुंबई | राज्य सरकार आणि केंद्र सकारही अनेकदा शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करते, आश्वासनेही देते. मात्र केलेल्या घोषणांची आणि दिलेल्या आश्वासनांची क्वचितच पूर्तता होते. अशा वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. (Farmers Long March) शेतकऱ्यांना पुन्हा आहे त्याच प्रश्नांशी लढावे लागते. गेल्या काही दिवसांपासून कांदा, द्राक्षे आणि इतर शेतीमालाचे दर सातत्याने कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये … Read more
अखेर ‘महानंद’चे अस्तित्व समाप्त..! असे असेल पुढील नियोजन | Mahanand Milk
मुंबई | महाराष्ट्र सहकारी दुध महासंघ मर्यादित अर्थात महानंदचे पुनरूज्जीवन करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठे प्रयत्न सूरू आहेत. याचाच भाग म्हणून आता महानंदला राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने सामावून घेण्यास सहमती दर्शवली आहे. याबाबतची पुढील चर्चा सुरू असून महानंदचे (Mahanand Milk) ४५० कर्मचारी सामावून घेण्याचीही तयारी एनडीडीबीने दर्शवली आहे. याबाबतची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more
राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा, कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता
मुंबई | राज्यातील अनेक भागात उद्यापासून (सोमवार) अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज असून यामुळे कापणीला … Read more