किसानवाणी | शेतकऱ्यांना जमिनीत सेंद्रीय घटकांच्या वापराद्वारे जलधारण क्षमता वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गावोगावी घेण्यात येणाऱ्या सर्व पिकांच्या शेती शाळेच्या अभ्यासक्रमात जलधारण क्षमता तपासणी हा लघु प्रयोग समाविष्ट करण्यात आला आहे. चला तर पाहूया सातारा जिल्ह्यातील निसराळे गावात घेण्यात येत असलेल्या ऊस पिकाच्या शेती शाळेतील हा जमिनीची जलधारण क्षमता तपासणी प्रयोग.. (How to check water holding capacity of soil)
शेतकऱ्यांना 3 महिन्यात लखपती करणारी ‘चिया शेती’; जाणून घ्या सविस्तर | Chia farming
चिया ही एक औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव साल्विया हिस्पॅनिका आहे. चिया पिकाला (Chia farming) सुपर फूड मानले जाते. हे प्रामुख्याने फुलांचे रोप आहे. चिया हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. गेल्या काही वर्षापासून चिया पिकाची लागवड भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यासह इतर काही भागांत शेतकरी त्याची लागवड … Read more