365 दिवस उत्पन्न देणारा दूध व्यवसाय; शेतकऱ्यांसाठी ठरतोय आर्थिक आधार | Dairy Farming 365 Days

Dairy Farming 365 Days

किसानवाणी : शेतीसोबत जोडधंदा म्हणून किंवा मुख्य व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय (Dairy Farming 365 Days) हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कायमच उत्पन्नाचा विश्वासार्ह स्रोत मानला जातो. पिकांवर आधारित शेतीमध्ये हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढ-उतार यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र दूध व्यवसाय हा वर्षभर चालणारा व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस आर्थिक स्थैर्य देण्याची क्षमता … Read more

शेतकरी कर्जमाफी बद्दल सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली; सीबील स्कोअरची अट हटवली, बँकांना देखील कडक निर्देश | Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver

मुंबई | महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारी आणि अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शेतकरी कर्जमाफी योजना (Farmer Loan Waiver) आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, त्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये आणि शेती उत्पादनावर आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे … Read more

खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धा निकाल जाहीर; कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर दमदार कामगिरी | Kharif Crop Competition 2025

Kharif Crop Competition 2025

कोल्हापूर : राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा’ (Kharif Crop Competition 2025) योजनेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे … Read more

El Nino and Kharif season |अलनिनो आणि खरीप हंगाम : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ?

El Nino and Kharif season

El Nino and Kharif season : यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ‘अलनिनो’ हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, अलनिनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसाचा खंड पडणे किंवा अनियमित पाऊस होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे देशातील तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर खरीप नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य पीकनियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर … Read more

Fertilizers Subsidy: केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, खरिपासाठी खतांच्या अनुदानात मोठी वाढ

Fertilizers Subsidy

Fertilizers Subsidy: पश्चिम आशियातील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम भारतातील खरीप हंगामावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पोषकद्रव्य आधारित अनुदान (NBS) योजनेअंतर्गत आगामी २०२६ च्या खरीप हंगामासाठी युरिया वगळता (नॉन-युरिया) इतर … Read more

मोठी बातमी! अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्य सरकारची अर्थसंकल्पात मोठी घोषणा | Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi 2026

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi 2026

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi 2026: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत राज्य सरकारने अर्थसंकल्प 2026 मध्ये कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘पी एम किसान’ योजनेची रक्कम वाढणार; ६,००० रुपयांवरून ९,००० रुपये होण्याची शक्यता | PM Kisan Yojana

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची वार्ता लवकरच समोर येऊ शकते. केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेची वार्षिक रक्कम ६,००० रुपयांवरून ९,००० रुपये (किंवा त्याहून अधिक) पर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. संसदेत सादर होणाऱ्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण शेतकरी समाज डोळे लावून बसला आहे. शेतीचा वाढता … Read more

पतीच्या निधनानंतर एकटी महिला शेती करू शकत नाही म्हणणाऱ्यांना 200 टन द्राक्षे पिकवून दिले उत्तर | Sangita Pingale

Sangita Pingale

संगिता पिंगळे यांची यशोगाथा पाहण्यासाठी खाली व्हीडीओ लिंक दिलेली आहे, ती देखील आपण पाहू शकता. 💐 असामान्य यशोगाथा! 💐 पतीच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांत बाळंतपण… मागोमाग दुःखाच्या, विवंचनेच्या लाटांचा भयानक तडाखा! हादरवून टाकणारी ही परिस्थिती होती एका सामान्य गृहिणीची. आयुष्यात शेतीचा शून्य अनुभव असताना, “तुला हे जमणार नाही,” असं म्हणणाऱ्यांना थेट कृतीतून उत्तर देणारी ही … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पाणंद रस्ते व शेतरस्त्यांवरील वाद मिटणार; मिळणार कायदेशीर मान्यता | Panand Roads

Panand Roads

किसानवाणी | महसूल विभागाने यावर्षी ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पाणंद रस्त्यांची (Panand Roads) निर्मिती व कायदेशीर वैधता निश्चित करण्यासाठी विभागाने विशेष मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबरच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबरच्या जयंतीपर्यंत राबवल्या … Read more

Monsoon 2025: माॅन्सूनचा पाऊस यंदाही चांगला बरसणार; विविध जागतिक हवामान केंद्रांचा अंदाज

किसानवाणी | देशात आतापासूनच २०२५ च्या मॉन्सून हंगामाबाबत (Monsoon 2025) चर्चा सुरू झाली असून, विविध जागतिक हवामान संस्थांनी सरासरी पावसाचे संकेत दिले आहेत. युरोपियन हवामान अंदाज केंद्र, दक्षिण कोरियाचे अपेक हवामान केंद्र, कोलंबिया विद्यापीठाचे आयआरआय केंद्र, जपानचा हवामान विभाग आणि युके हवामान विभागाने भारतात मॉन्सून समाधानकारक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग … Read more