ड्रॅगन फ्रूटची आवक तिपटीने वाढली; दोन दिवसांत बाजारभावात मोठी घसरण, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट | Dragon Fruit

Dragon Fruit

किसानवाणी : स्थानिक फळ व भाजीपाला बाजारात गेल्या पंधरवड्यापासून ड्रॅगन फ्रूटची(Dragon Fruit)आवक सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः बुधवारी (ता. २९) बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक तब्बल २१० क्विंटलवर पोहोचली. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत आवक तिपटीहून अधिक वाढल्याने बाजारातील मागणी-पुरवठ्याचे संतुलन बदलले असून त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. वाढलेल्या आवकेमुळे ड्रॅगन फ्रूटच्या बाजारभावावर … Read more

NPA पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीसाठी बँकांना पाळावे लागणार हे बंधनकारक सूत्र; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Maharashtra NPA Accounts

Maharashtra NPA Accounts

किसानवाणी : राज्यात सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुत्पादक (Maharashtra NPA Accounts) खात्यांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांवरच असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाने यासाठी निश्चित केलेल्या सवलत सूत्राची प्रत्येक बँकेने … Read more

वन्य प्राण्यांमुळे 10 हजार ते 40 हजार कोटींचे पीक नुकसान; भरपाई मात्र फक्त 50 कोटींच्या आसपास | Maharashtra Wildlife

Maharashtra Wildlife

किसानवाणी : महाराष्ट्रात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हा दिवसेंदिवस गंभीर (Maharashtra Wildlife) होत चाललेला प्रश्न असून, वर्षानुवर्षे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये केवळ नुकसानभरपाई नव्हे तर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. सध्या वनविभागामार्फत पीक नुकसानीसाठी स्वतंत्र नुकसानभरपाईची व्यवस्था असली तरी ती शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी नसल्याचे विविध … Read more

पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! १३ ऑगस्टपासून राज्यभर लाळ्या खुरकूत लसीकरण मोहीम | Foot and Mouth Disease

Foot and Mouth Disease

किसानवाणी : राज्यातील पशुधनाला लाळ्या खुरकूत (Foot and Mouth Disease) या अत्यंत संसर्गजन्य आणि घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण मिळावे, यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची नववी फेरी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त … Read more

ई-ठिबक पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; ठिबक वितरकांचे प्रस्ताव रद्द करू नका, कृषी विभागाच्या सूचना | Maharashtra E-Drip Portal

Maharashtra E-Drip Portal

किसानवाणी : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागाच्या ई-ठिबक (Maharashtra E-Drip Portal) पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ठिबक सिंचन अनुदानाशी संबंधित विविध प्रक्रिया रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फलोत्पादन संचालनालयाने राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) महत्त्वाच्या सूचना दिल्या असून, ई-ठिबक पोर्टलवरील तांत्रिक दोष दूर होईपर्यंत ठिबक वितरकांचे नोंदणी … Read more

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट | Maharashtra Monsoon Red Orange Alert

Maharashtra Monsoon Red Orange Alert

किसानवाणी : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. राज्यात सध्या ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू असून पुढील तीन ते चार दिवसांत हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Maharashtra … Read more

एल निनोचा इशारा! महाराष्ट्रातील खरीप शेतीसमोर कोणती मोठी आव्हाने? | El Nino Maharashtra Monsoon

El Nino Maharashtra Monsoon

किसानवाणी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने ( El Nino Maharashtra Monsoon ) यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा सुमारे १२ टक्के पावसाची तूट राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामागे ‘एल निनो’ची स्थिती हे प्रमुख कारण मानले जात आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, राज्यातील बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन बियाणे धोरण; बनावट बियाण्यांवर बसणार कडक लगाम | Maharashtra Seed Policy Quality

Maharashtra Seed Policy Quality

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि प्रमाणित बियाणे (Maharashtra Seed Policy Quality) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करणार आहे. निकृष्ट आणि बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखणे, बियाणे व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करणे आणि गुणवत्ता नियंत्रण अधिक सक्षम करणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय … Read more

नाबार्डमुळे १७६ कृषी व ग्रामीण उत्पादनांना GI Tag; १३ हजार उत्पादकांना मोठा फायदा | NABARD GI Tag Geographical Indication

NABARD GI Tag Geographical Indication

किसानवाणी : देशातील पारंपरिक कृषी आणि ग्रामीण उत्पादनांना जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळावी, स्थानिक उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, या उद्देशाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (NABARD GI Tag Geographical Indication ) महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत देशातील शेती आणि ग्रामीण भागाशी संबंधित तब्बल १७६ उत्पादनांना … Read more

Coco Peat GST | कोकोपीटलाही जीएसटीमुक्त करा; वाढत्या किमतींमुळे नर्सरी उद्योग संकटात

Coco Peat GST

किसानवाणी : सर्व प्रकारच्या बियाण्यांप्रमाणे कोकोपीटलाही वस्तू व सेवा कर (Coco Peat GST) मधून सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशनने राज्य शासनाकडे केली आहे. गेल्या काही वर्षांत कोकोपीटच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ, देशांतर्गत उपलब्धतेतील घट आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे नर्सरी उद्योगावर आर्थिक ताण वाढत असल्याचे असोसिएशनने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. … Read more