शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! भारत-जपान उभारणार 1,000 बायोगॅस प्रकल्प; शेण व कृषी कचऱ्यापासून होणार उत्पन्न | India Japan CBG Initiative

India Japan CBG Initiative

किसानवाणी : भारत आणि जपान यांनी स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि शाश्वत कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘भारत-जपान कॉम्प्रेस्ड बायोगॅस (India Japan CBG Initiative) उपक्रमा’ची घोषणा केली आहे. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी गुरुवारी ‘भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचा’ला संबोधित करताना या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत भारतातील शेण, भाताचा पेंढा, उसाचे अवशेष … Read more

Agriculture Education | कृषी क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी; दहावीनंतर ते पीएचडीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन

Agriculture Education

किसानवाणी : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्रामध्ये (Agriculture Education) गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि संरचनात्मक बदल होत आहेत. देशातील सुमारे ५५ टक्के लोकसंख्या आजही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेती आणि कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल, अन्नधान्याची वाढती मागणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे कृषी क्षेत्र अधिक विज्ञानाधिष्ठित … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी माती, मुरूम, गाळ मोफत; रॉयल्टी पूर्णपणे माफ | Maharashtra Farmers Minor Minerals

Maharashtra Farmers Minor Minerals

किसानवाणी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विकासकामांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या (Maharashtra Farmers Minor Minerals) माती, मुरूम आणि गाळासारख्या गौण खनिजांवर रॉयल्टीमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्वतःच्या वापरासाठी या साहित्याची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार … Read more

१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६२४ कोटी जमा; नांदेडला सर्वाधिक भरपाई | PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

किसानवाणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप २०२५ हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १६२४ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकरी आतुरतेने … Read more

BBF Farming | कमी पाऊस असो की अतिवृष्टी, बीबीएफ लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

BBF Farming

किसानवाणी : हवामानातील सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी अत्यल्प पाऊस, कधी अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस, तर कधी अतिवृष्टी अशा अनिश्चित परिस्थितीचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत आहे. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांची मुळे कुजण्याचा धोका वाढतो, तर कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत … Read more

गोदाम नोंदणीचे नवीन निकष; WDRA चे नियम, शुल्क, विमा आणि आवश्यक सुविधांची ‘संपूर्ण’ माहिती | Warehouse Development and Regulatory Authority

Warehouse Development and Regulatory Authority

किसानवाणी : देशात शास्त्रीय पद्धतीने गोदाम व्यवस्था विकसित (Warehouse Development and Regulatory Authority) करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या बाजारव्यवस्थेशी जोडणे, कृषी मालाच्या साठवणुकीला चालना देणे तसेच ग्रामीण भागात कर्जाची उपलब्धता वाढविणे या उद्देशाने केंद्र शासनाने विविध धोरणे राबविली आहेत. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना व प्रकल्प सुरू करण्यात आले असले, तरी कृषी … Read more

ICRISAT Groundnut Varieties | भुईमुगाचे दोन नवीन वाण विकसित; ८१% ओलिक अॅसिड, ५३% तेलाचा मोठा फायदा

ICRISAT Groundnut Varieties

किसानवाणी : देशातील खाद्यतेल उत्पादनात वाढ करण्याबरोबरच भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अॅरिड ट्रॉपिक्स (ICRISAT Groundnut Varieties) ने भुईमुगाचे दोन नवीन उच्च ओलिक (High Oleic) वाण विकसित केले आहेत. या दोन्ही वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय समन्वित भुईमूग संशोधन प्रकल्पाने (AICRP-Groundnut) राष्ट्रीय … Read more

Polyhouses Farming Techniques | पॉलिहाउसचे किती प्रकार आहेत? कोणत्या पिकासाठी कोणते मॉडेल योग्य?

Polyhouses Farming Techniques

किसानवाणी : बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढते तापमान, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या आव्हानांमुळे पारंपरिक शेतीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत कमी क्षेत्रातून अधिक, दर्जेदार आणि वर्षभर उत्पादन मिळवून देणारे संरक्षित शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी प्रभावी पर्याय ठरत आहे. संरक्षित शेतीमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि परिणामकारक तंत्रज्ञान म्हणजे पॉलिहाउस (Polyhouses Farming Techniques). पारदर्शक … Read more

द्राक्ष उत्पादक सावधान! पावसानंतर ‘या’ रोगांचा वाढणार धोका; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा | Maharashtra Agriculture Monsoon

Maharashtra Agriculture Monsoon

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी सध्या मुसळधार पावसाचा (Maharashtra Agriculture Monsoon) प्रभाव मुख्यतः कोकण किनारपट्टीपुरताच मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि द्राक्ष उत्पादक पट्ट्यात अजूनही सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामानातील बदलांचा विचार करता ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असून त्याचा परिणाम मॉन्सूनवर दिसून येत आहे. दुसरीकडे आयओडी (Indian Ocean Dipole) अद्याप तटस्थ स्थितीत … Read more

Seed Germination | कमी पावसातही बियाण्याची 100% उगवण हवी? मग या 5 गोष्टी ‘नक्की’ पाळा…

Seed Germination

किसानवाणी : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर पावसाचे वितरणही अनियमित राहण्याचा अंदाज असल्याने खरीप हंगामातील शेतीचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरणार आहे. अशा परिस्थितीत पीक उत्पादनावर परिणाम होऊ नये, यासाठी पेरणीपासूनच योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा … Read more