किसानवाणी | सहकाराची पाळमुळं पश्चिम महाराष्ट्रात खोलवर रूजलीत, पण हा सहकार कोकणात रूजवला आणि कोकणातील मेव्यावर प्रक्रिया केली, तर कोकणातील ग्रामीण अर्थकारण बदलू शकतं. मुंबईतील सहकारी बॅंकेत नोकरी केलेल्या विचारे यांनी हाच विचार करून, निवृत्तीनंतर रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची उभारणी केलीय. आज ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांच्या काजूवर प्रक्रिया (Cashew Nut Processing Business) करून त्यांना चांगला दर मिळवून देताहेत. चला तर आज आपण कोकणातील ‘या’ सहकारी तत्वावर चालणाऱ्या प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊया…
शेतकरी लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा ह्रदयद्रावक मृत्यू; आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का?
मुंबई | शेतकरी लाँग मार्चच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्याना रूग्ण्लयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच … Read more